न्यूझीलंडमधील हॅमिल्टनजवळील बटाट्याच्या मळ्यात ७.९ किलो बटाटा मिळाला आहे जो जगातील सर्वात मोठा बटाटा असू शकतो. हा बटाटा पाहिल्यानंतर ज्या जोडप्याला याचा शोध लागला त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही आणि त्यांनी ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’साठी अर्जही केला आहे. या बटाट्याचे फोटोही इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होत आहेत आणि एवढा मोठा बटाटा पाहून काही लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

कधी सापडला हा बटाटा?

हा बटाटा गेल्या ३० ऑगस्टला कॉलिन आणि डोना क्रेग-ब्राऊन नावाच्या जोडप्याच्या मळ्यातून बाहेर आला. कॉलिन म्हणाला, ‘आम्ही आमच्या मळ्यात खोदत असताना आम्हाला हा मोठा बटाटा सापडला. सुरुवातीला आमचा विश्वास बसला नाही की तो बटाटा आहे, पण नंतर तो खणून काढल्यावर तो बटाटा असल्याचे निष्पन्न झाले.

( हे ही वाचा: सिंहासोबत व्हिडीओ काढण्यासाठी त्याने बसची खिडकी उघडली अन्… )

हा बटाटा ७.९ किलो वजनाचा जगातील सर्वात मोठा बटाटा असण्याची दाट शक्यता आहे. कॉलिन आणि डोना क्रेग-ब्राऊन यांच्या मळ्यातून आलेल्या या मोठ्या बटाट्यामुळे दोघेही प्रसिद्ध झाले आहेत. दोघांनीही या बटाट्याला ‘डग’ असे नाव दिले आहे.

( हे ही वाचा: याला म्हणतात हर कुत्ते का दिन आता है… सिंह कुत्र्याला घाबरुन पळाला अन् व्हिडीओ व्हायरल झाला )

सर्वात वजनदार बटाट्याचा सध्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड ब्रिटनमध्ये २०११ मध्ये पाच किलोग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या बटाट्यासाठी आहे. या जोडप्याचे म्हणणे आहे की त्यांनी डगची नोंद करण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अर्ज केला आहे. मात्र, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून त्यांना या संदर्भात कोणताही अभिप्राय मिळालेला नाही.