तब्बल तेरा वर्षांनी भारताची प्रतिक्षा अखेर संपली आहे. भारताने २९ जूनला बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हलवर झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करत भारताला टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. भारताने दुसरा टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकला हे विशेष. या संपूर्ण स्पर्धेत भारत अपराजित राहिला हे विशेष. भारताचा हा दणदणी विजय शक्य झाला तो भारतीय संघाच्या अथक मेहनतीने आणि परिश्रमामुळे. भारतीय संघाने मिळवलेल्या या विजयाचे कौतूक करावे तितके कमी आहे. भारताने मिळवलेल्या विजयाचे फक्त देशात नाही तर परदेशातील भारतीयांनी देखील उत्साहात स्वागत केले. शहरातील कानाकोपऱ्यात लोकांनी रस्त्यावर उतरून भारताचा विजय साजरा केला. कोणी फटाक्यांची आतिषबाजी केली तर कोणी नाचून आनंद व्यक्त केला. अनेकांनी विविध पद्धतीने भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान सध्या भारतीय संघाच्या विजयासाठी तरुणाने अनोख्या पद्धतीने सलामी आहे. सोळल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. तरुणाने अशी गोष्ट केली आहे ज्या कोणी कधी कल्पनाही केली नसेल. व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुणाने त्याच्या पायाखाली एक पाट ठेवला आहे आणि त्यावर त्याने एका वर एक असे दोन स्टिलचे ग्लास ठेवून त्यावर तो उभा स्वत:चा तोल सावरत आहे. एवढचं नाही तर त्या तरुणाने चक्क स्वत:च्या डोक्यावर काचेचा ग्लास ठेवून त्यावर दोन सिलेंडर ठेवले आहेत. तरुण परफेक्ट बॅलन्स राखताना दिसतो आहे. त्यानंतर त्याने भारताचा ध्वज घेतलेला दिसत आहे. तरुणाने ज्या पद्धतीने भारतीय संघाला सलामी दिली आहे हे खरचं कौतूकास्पद आहे. प्रत्येकाकडे काही ना काही कौशल्य असते. हेही वाचा - “याला म्हणतात खरा फिटनेस!” न थांबता फक्त ६० सेकंदात मारले २५ पुल-अप्स’, ५६ वर्षांच्या मेजर जनरल यांचा Video Viral तरुणाने आपले अनोखे कौशल्या वापरून भारतीय संघाला ही आगळी वेगळी सलामी दिली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी भरपूर कमेंट केल्या आहे. एकाने लिहिले, "हे फक्त भारतात घडू शकतं", दुसऱ्याने लिहिले की,"किती दुखत झाली असेल याची मी कल्पनाही करू शकत नाही.. तुम्ही खूप हिंमत दाखवली" तिसऱ्याने म्हटले, "एवढं प्रेम सर्वांवर करा" चौथ्याने लिहिले, "हे सर्व फक्त भारतातच पाहायला मिळेल"