Viral Video : मेट्रोतील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतात तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतात. कधी कोणी भांडताना दिसतात तर कधी कोणी स्टंटबाजी करताना दिसतात. अनेकदा मेट्रोमध्ये धक्कादायक घटना सुद्धा घडतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण अचानक मेट्रोमध्ये चक्कर येऊन पडतो, पुढे त्याच्याबरोबर काय घडते, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

मेट्रोमध्ये तरुण अचानक चक्कर येऊन पडला

हा व्हायरल व्हिडीओ एका मेट्रोमधील आहे. या मेट्रोच्या एका डब्यात काही प्रवासी उभे आहेत तर काही प्रवास बसलेले दिसत आहे. अचानक एका तरुणाला चक्कर येते तेव्हा अचानक एक महिला जागेवरून उठते आणि त्या तरुणाला उठायला मदत करते. त्यानंतर ती तिच्या जागेवर जाऊन बसते. पण तिचे लक्ष त्या तरुणाकडे असते. त्याला अस्वस्थ वाटत असल्याचे पाहून ती पुन्हा जागेवरून उठते आणि त्या तरुणाजवळ जाते. त्याची विचारपूस करते. त्यानंतर पाणी प्यायला देते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही त्या महिलेच्या कृतीचे कौतुक कराल.
या व्हिडीओमध्ये तरुण त्याचा अनुभव सांगतो, “त्या महिलेला वाटत होते की कोणीतरी माझी मदत करेन पण जेव्हा कोणीही मदत केली नाही तेव्हा तिने तिच्या मुलाप्रमाणे मला समजून माझ्याकडून आली आणि मला प्यायला पाणी दिले.”

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
a friend saved life of his friend by using presence of mind
VIDEO : मित्राच्या प्रसंगावधानाने वाचला तरुणाचा जीव, नेटकरी म्हणाले, “शंभर नातेवाईक असण्यापेक्षा एक असा मित्र हवा”
Passengers inside metro over seat issues shocking video goes viral on social media
हद्दच झाली! मेट्रोमध्ये एका सीटसाठी महिलेने ओलांडली मर्यादा; VIDEO पाहून संतापले लोक
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Viral shocking accident while overtaking The Car Fell From The Bridge While Overtaking Accident Video
अंगावर काटा आणणारा अपघात, पुलावरून कार थेट खाली कोसळली; VIDEO पाहून सांगा नेमकी चूक कुणाची?
Evil! Man Brutally Beats Girlfriend After Smashing Her To The Ground At Crowded Petrol Pump In UP's Ghaziabad
याला प्रेम म्हणायचं का? तरुणानं गर्लफ्रेंडबरोबर भरदिवसा काय केलं पाहा; VIDEO पाहून व्हाल सुन्न

हेही वाचा : VIDEO: मंदिरात किंवा गर्दीच्या ठिकाणी तुमचीही चप्पल चोरीला जाते का? मग हा जुगाड कराच, कधीच चप्पल चोरी होणार नाही

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

asligautam_09′ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “शेवटी आई ही आई असते.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आई ही खरी योद्धा असते” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप छान माणसाला अशा माणुसकीचं उदाहरण द्यायला पाहिजे.” एक युजर लिहितो, “ही आहे खरी आई” तर एका युजर लिहितो, “हल्ली असे प्रेमळ लोक खूप दुर्मिळ आहे”

हेही वाचा : फक्त प्रेम! साडी, दागिने नाही तर दिवाळीनिमित्त बायकोला दिलं हटके गिफ्ट, VIRAL VIDEO पाहून म्हणाल, ‘हेच तर…’

या तरुणाचे नाव गौतम असून तो लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी चक्कर येऊन पडल्याचे नाटक करतो. त्याने शेअर केलेल्या अनेक व्हिडीओमध्ये लोकांच्या प्रतिक्रिया कैद केल्या आहेत. अनेकदा त्याच्या व्हिडीओमध्ये माणुसकीचं दर्शन घडून येते.

Story img Loader