Viral Video : सोशल मीडियावर पुराच्या पाण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके भयानक असतात की पाहून अंगावर काटा येतो. काही लोक जीवाची पर्वा न करता धोका पत्करतात. अनेकदा अशा निष्काळजीपणामुळे अनेक लोकांना जीव सुद्धा गमवावा लागतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेली की पुलावरून पाणी जात आहे आणि तरी सुद्धा एक दुचाकी चालक तरुण पुल ओलांडण्याचा प्रयत्न करतो पण त्याचा तोल जातो आणि तो दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून जातो. पुढे त्याच्याबरोबर जे काही घडतं, ते पाहून कोणालाही धक्का बसेल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (A heart-stopping moment when a young man is swept away by floodwaters and people rush to help has gone viral)
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला नदीला पुर आलेला दिसून येईल आणि पुलावरून पाणी वाहून जाताना दिसेल. पुरावरून पाणी जात असताना सुद्धा काही लोक पुल ओलांडून जाण्याचा प्रयत्न करत आहे. पुलाच्या शेजारी काही लोक जमलेले दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक तरुण दुचाकी चालवत पुलावरून जाताना दिसतो. पण पुलावरून पाणी जात असल्यामुळे त्याचा तोल जातो आणि दुचाकीसह तो पुराच्या पाण्यात वाहून जाताना दिसतो पण तितक्यात पुलाच्या शेजारी उभे असलेले काही तरुण मदतीला धावतात आणि त्याचा जीव वाचवतात पण त्याची दुचाकी मात्र वाहून जाते. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. या व्हिडीओवर लिहिलेय, “माणुसकी”
पाहा व्हायरल व्हिडीओ
हेही वाचा : भारतीय लढाऊ हेलिकॉप्टरवर मणिपूरमधील स्वातंत्र्य सैनिकांनी केला हल्ला? नेमकं घडलं काय? जाणून घ्या सत्य बाजू
a2t_lyrics या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “गावातील आहे म्हणून माणुसकी असणारच. शहरातील लोक तर फक्त दुरून पाहत असतात.” तर एका युजरने लिहिलेय, “लाल टी – शर्ट घातलेल्या तरुणाने मन जिंकले. अशीच माणुसकी सर्वांनी दाखवावी.” आणखी एका युजरने लिहिलेय, “आमच्याकडला व्हिडीओ आहे. याची दुचाकी सुद्धा बाहेर काढली” एक युजर लिहितो, “कॅमेरा मॅन का कधीच मदत करत नाही?”