लग्नाचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ज्यात रोमँटिक, भावुक आणि मजेशीर क्षणही पाहायला मिळतात. पण सध्या अशा एका लग्नाची घटना समोर आली आहे, जी ऐकून सर्वजण हैराण झाले आहेत. उत्तर प्रदेशमधील एका विवाह सोहळ्यादरम्यान विचित्र घटना समोर आली आहे. यात एका तरुणाचे लग्न होणार होते. लग्नाची तयारी देखील पूर्ण झाली होती. परंतु घडल असं की, लग्नाचं संपूर्ण चित्रच बदलून गेलं आणि या घटनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं घडलं तरी काय?

उत्तर प्रदेशातील ओरैया येथे हेमेंद्र कुमार या तरुणाचे २५ नोव्हेंबरला लग्न होणार होते. लग्नाची तयारी देखील पूर्ण झाली होती परंतु याच दरम्यान हेमेंद्र कुमार याच्या पहिल्या पत्नी बिनूला ही माहिती मिळाली. त्यानंतर तिने तातडीने औरैया येथील दिबियापूर पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांना संपूर्ण माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरणाचा आढावा घेतला. त्याचवेळी तरुण ज्या तरुणीसोबत दुसरे लग्न करणार होते, त्या मुलीच्या वडिलांनीही पोलिसांत तक्रार करून फसवणुकीचा आरोप केला आहे.

(आणखी वाचा : अरे बापरे! क्रूझमधून समुद्रात पडला प्रवासी; अन् पुढे घडलं असं काही…व्हिडीओ व्हायरल )

तरुणाला आहे तीन वर्षांची मुलगी

हेमेंद्र कुमार याचा २०१७ मध्ये बिनू नावाच्या तरुणीशी विवाह झाला होता. बिनूचा आरोप आहे की, जेव्हा हेमेंद्रने तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. यादरम्यान दोघांमध्ये वादही सुरू झाला. तेव्हा ती तिच्या माहेरी निघून गेली. दरम्यान, बिनूने तीन वर्षांच्या मुलीला जन्म दिला. हेमेंद्रच्या कुटुंबीयांनी त्याचे लग्न दिबियापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका तरुणीसोबत निश्चित केल्याचा आरोप आहे. लग्न २५ नोव्हेंबरला होणार आहे. हे कळताच बिनूने तिच्या कुटुंबीयांसह दिबियापूर पोलीस ठाणे गाठून संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. हेमेंद्रचे लग्न रोखण्यासाठी बिनूने पोलिसांना अर्ज दिला.

हेमेंद्रवर मुलीच्या वडिलांनी केला फसवणुकीचा आरोप

हेमेंद्रचे लग्न ज्या मुलीसोबत होणार होते. त्यांनीही पोलिसांत तक्रार करून हेमेंद्रवर फसवणुकीचा आरोप केला आहे. मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार केली की, मुलाच्या कुटुंबीयांनी मुलाला अविवाहित असल्याचे सांगितले होते. विवाहित असल्याची माहिती देण्यात आली नाही. आपली फसवणूक झाल्याचे मुलीच्या वडिलांनी सांगितले. याशिवाय हुंडा घेतल्याचा आरोप यापूर्वीही करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The young man was preparing for his second marriage in uttar pradesh when his first wife lodged a complaint with the police pdb
First published on: 27-11-2022 at 11:47 IST