सोशल मीडिया साइट रेडिटवर एका अमेरिकन महिलेचे फोटो चर्चेत आहेत. या महिलेने वडिलांच्या मृतदेहासमोर उभे राहून फोटो काढले आहेत. शेवटच्या निरोपाच्या वेळी महिलेने ज्या पद्धतीने ग्लॅमरस पोज दिली, त्यावर युजर्स प्रश्न उपस्थित करत आहेत.

काय आहे फोटोमध्ये?

वास्तविक, एका अमेरिकन महिलेचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वडिलांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांनी हे फोटो काढले आहेत. या फोटोंमध्ये महिलेच्या मागे शवपेटीमध्ये एक मृतदेह ठेवलेला दिसत आहे.’डेली स्टार’च्या वृत्तानुसार, हा मृतदेह अन्य कोणाचा नसून महिलेच्या वडिलांचा आहे. वडिलांच्या अंत्यसंस्कारात या महिलेने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अतिशय ग्लॅमरस स्टाईलमध्ये पोज दिली. वडिलांच्या शवपेटीजवळ एक मिनी ड्रेस घातलून फोटो काढलेत.

( हे ही वाचा: T20 World Cup 2021: पहिल्या लढतीपूर्वी राष्ट्रगीतादरम्यान अफगाणिस्तानच्या कर्णधाराला अश्रू अनावर!

नेटीझन्सने फटकारले

महिलेने तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले, जिथून ते Reddit वर ग्रुपमध्ये शेअर केले गेले. त्यानंतर युजर्सनी महिलेला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका युजरने महिलेचे वर्तन अतिशय अयोग्य आणि असभ्य असल्याचे सांगितले, तर दुसऱ्या युजरने म्हटले की, एखाद्याच्या मृत्यूवर असे कृत्य शोभणारे नाही, लज्जास्पद आहे.

विशेष म्हणजे मृतदेहासमोर उभे राहून असे फोटो काढणे कुणालाच आवडले नाही. याबाबत युजर्सनी महिलेला खूप फटकारले. मात्र, महिलेने असे का केले याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.