आपण अनेकदा लोकांना वाहतुकीचे नियम मोडताना पाहतो. कोणी गाडीचे कागदपत्र सोबत ठेवत नाहीत, तर कोणी हेल्मेट घालत नाही. अशावेळी समोर पोलीस दिसल्यास मात्र हे लोक गाडीचा वेग वाढवून पळण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा ट्राफिक पोलीस त्यांचा पाठलाग करताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला दंड वाचवण्यासाठी स्कुटी घेऊन पळताना दिसतेय.

व्हिडीओमध्ये एक महिला हेल्मेट न घालता रस्त्यावर स्कुटी चालवत असल्याचे दिसून येते. यादरम्यान ती वाहतुकीचे नियमही पाळत नव्हती. यावेळी स्कुटी चालवणाऱ्या महिलेला एक महिला वाहतूक पोलीस रस्त्यावर उभी असलेली दिसली. तेव्हा आपले चलन कापले जाणार याची तिला कल्पना येते. त्यानंतर महिला आपल्या स्कूटीचा वेग वाढवते आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करते.

boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
newly wedded wife calls her husband aho viral video
बायकोची ‘ती’ हाक ऐकताच लाजली ‘अहों’ची स्वारी! सासरची मंडळीही खुदकन हसली; पाहा Video
live-in partner killed and hung the body on tree
नागपूर : खून करून झाडाला लटकवला मृतदेह, लिव्ह इन पार्टनरचा बनाव…
people washing plates in fountain in wedding
Viral Video : लग्नात सजावटीसाठी लावला होता पाण्याचा कारंजा, पण लोकांनी जेवणाची ताटं धुतली, एकदा व्हिडीओ पाहाच

पोलिसांनाही ‘कच्चा बादाम’ गाण्याची क्रेझ; डान्स करतानाचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

आता चंद्रावरही मिळणार High Speed Internet; २०२४ पर्यंत Wifi पोहचवण्याची तयारी सुरु

ही महिला स्कूटी घेऊन पळू लागताच महिला पोलिसही तिच्या मागे धावू लागते. रस्त्यावरचे दृश्य पाहण्यासारखे होते. गंमत म्हणजे ती महिला पोलीस इतकी जोरात धावते की स्कूटीवर चालणारी महिला पुढे जाऊच शकली नाही. यानंतर महिलेचे चलन कापले जाते. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्या महिलेला वाटते की ती पोलिसाला चकमा देऊन निघून जाईल आणि तिचे चलन कापले जाणार नाही. म्हणून तिने वेगाने स्कूटी पळवली. मात्र, ट्रॅफिक पोलिसाचा वेग तिच्या स्कूटीपेक्षा जास्त आहे हे त्या महिलेला माहित नव्हते.

व्हिडीओमध्ये दिसणारे दृश्य खूपच मजेदार आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून त्याला आतापर्यंत २ लाख ५० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.