scorecardresearch

Premium

चोरी आली अंगलट! चाकूचा धाक दाखवून मोबाइल चोरण्यासाठी आले आणि घडली जन्माची अद्दल, थरारक घटनेचा VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीचा मोबाईल चोरण्यासाठी आलेल्या चोरट्यांना जन्माची अद्दल घडल्याचं पाहायला मिळत आहे.

Punjab Snatchers Viral Video
चोरी करणं आलं अंगलट. (Photo : X)

चोरटे अनेकदा एकटे फिरणाऱ्या लोकांना लक्ष्य करतात आणि त्यांच्याकडील महागड्या वस्तू चोरतात. मग ते कधी लोकांच्या हातातले मोबाईल चोरतात तर कधी गळ्यातील सोनसाखळी पळवून नेतात. परंतु कधी कधी या चोरट्यांना चोरी करणं खूप महागातही पडतं, याबाबतच्या अनेक घटना तुम्ही याआधीही पाहिल्या असतील. सध्या पंजाबमधील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये घराबाहेर फिरत असलेल्या एका व्यक्तीचा मोबाईल चोरण्यासाठी आलेल्या चोरट्यांना जन्माची अद्दल घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल होणारा व्हिडीओ पंजाबमधील असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडीओत दिसत आहे की, एक व्यक्ती रात्रीच्या सुमारास घराबाहेर उभा होता. यावेळी तिन चोरटे तिथे येतात आणि चाकूचा धाक दाखवून त्या व्यक्तीच्या हातातील मोबाईल पळवण्याचा प्रयत्न करतात. पण यावेळी तो व्यक्ती या चोरट्यांनाच जबर मारहाण करतो. यावेळी दोन चोरट्यांना जोरात चापट मारतो आणि त्यानंतर शेजारी उभ्या असलेल्या कारमधून रॉड काढून त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात करतो.

OBC
ओबीसींचा खरा शत्रू कोण?
Pet dog bites young man crime against woman
पिंपरी : पाळीव श्वानाचा तरुणाला चावा, महिलेविरोधात गुन्हा
Postpartum diet New mothers keep these nutritional points in mind after giving birth
बाळाला दूध पुरत नाही, पोट भरत नाही; पहिल्यांदा आई झालेल्या स्तनदा मातांनी स्वत:सह बाळाची कशी काळजी घ्यावी?
man-unique-trick-to-save-from-cold-put-fire-in-a-bicycle-seat-heated-instantly-viral-video
थंडीपासून वाचण्यासाठी हटके जुगाड! सायकलच्या सीटमध्ये टाकले जळत्या लाकडाचे तुकडे; Video एकदा बघाच…

हेही वाचा – कार किंवा बाईकने नव्हे चक्क विमानाने ऑफिसला जाते ‘ही’ मुलगी; म्हणाली, “स्वस्त पडतं…”

त्या व्यक्तीच्या हातात रॉड पाहून चोरटे तेथून पळ काढण्याचा प्रयत्न करतात, मात्र तो व्यक्ती त्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण करत असल्याचंही व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी त्याने दोन चोरट्यांना जबर मारहाण केल्याचं दिसत आहे. तर तिसरा पळून गेल्यामुळे थोडक्यात बचावतो. या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमामात व्हायरल होत असून नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकजण या व्हिडीओतील व्यक्तीच्या धाडसाचे कौतुक करत आहेत.

एकाने लिहिलं, “या व्यक्तीचे १००० वेळा कौतुक केलं तरी कमीच आहे.” तर दुसऱ्याने लिहिलं, “तिघेही मद्यधुंद अवस्थेत दिसत आहेत, त्यांना मारहाण केलं ते योग्यच केलं.” सध्या पंजाबमध्ये स्नॅचर टोळ्या सक्रिय असून चेन स्नॅचिंगच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. याआधी भटिंडा येथे एका महिलेच्या कानातले हिसकावून नेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यावरुन नेटकऱ्यांनी तेथील सरकारला खूप ट्रोल केलं होतं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: They came to steal a mobile phone by showing the threat of a knife the punjab snatchers video of the incident went viral jap

First published on: 02-12-2023 at 12:48 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×