Thief confession funny video in chattisgarh goes viral watch gps 97 | Loksatta

Video: “चोरी करून भारी वाटले पण…” चोराचे उत्तर ऐकून पोलीसही लागले हसायला अन तितक्यात…

छत्तीसगडमधील एसपींच्या प्रश्नांचा आणि चोरांच्या उत्तरांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Video: “चोरी करून भारी वाटले पण…” चोराचे उत्तर ऐकून पोलीसही लागले हसायला अन तितक्यात…
photo: social media

छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातून एका चोराची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. कबुलीजबाबात चोराने सांगितलेली गोष्ट ऐकून एसपी साहेबही चकित झाले. यादरम्यान त्यांना हसू आवरता आले नाही. एसपींच्या प्रश्नांचा आणि चोरांच्या उत्तरांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पहिल्यांदा चोरी करणे चांगले वाटले… पण नंतर

पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अनेक पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापे टाकून चोरट्यांची टोळी पकडली होती. चौकशीत एका चोरट्याने अडीच लाखांच्या चोरीत दहा हजार रुपये मिळाल्याचे सांगितले. त्याला जेव्हा एसपी साहेबांनी विचारले की, चोरी करून कसे वाटले तर तो म्हणाला, आधी चोरी करताना बरे वाटले पण नंतर पश्चाताप झाला. त्यावर चोरीची रक्कम रस्त्याच्या कडेला बसलेल्या गाई, कुत्रे आणि गरिबांना ब्लँकेट आणि अन्न पुरवण्यात खर्च करण्यात आल्याचंही तो म्हणाला. चोराचे हे उत्तर ऐकून पोलीस अधिकारीही हसले.

( हे ही वाचा: Anand Mahindra Tweet: आनंद महिंद्रा यांच्या पसंतीस पडली देसी जुगाड केलेली ‘ही’ इलेक्ट्रिक बाईक; म्हणाले “जगासाठी…”)

दारूला स्पर्शही करत नाही

दुसर्‍या चोराने सांगितले की तो गांजाच्या नशेत चोरी करतो. तर आणखी एकाने चोरीच्या रकमेचा जुगार खेळल्याचे सांगितले. तो भिलाई येथील ललित कबाडी येथे राहतो. चोरीचा माल तेथे खुलेआम खरेदी केला जातो. तो दारूला हातही लावत नाही, पण रोज ५० रुपये किमतीचा गांजा आणि ७ रुपये किमतीची बिडी पितो, असेही त्याने सांगितले.

( हे ही वाचा: Video: नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा जिममध्ये खतरनाक व्यायाम; दोन्ही पाय हवेत नेले अन…)

चोरांच्या अटकेबाबत एसपी म्हणाले की, या सर्वांमध्ये सुधारणा करून त्यांना इतरांमध्ये सामील करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जेणेकरून समाजात शांतता नांदावी. त्यांच्या सुधारणेसाठी समाजानेही प्रयत्न केले पाहिजेत. गुन्हेगारांशी सातत्याने संवाद साधून आणि समुपदेशन करून समाजातून गुन्हेगारी नष्ट प्रयत्न दुर्ग पोलिस करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 13:20 IST
Next Story
‘पागल ये जवानी है, मेरा हुस्न पाणी है’ गाण्यावर तरुणीचा चक्क रेल्वे प्लॅटफॉर्मवर भन्नाट डान्स, नजरा खिळवणारा Viral Video पाहतच राहाल