चोरटे चाकूने वार करून, शस्त्राचा धाक दाखवून किंवा हात की सफाई करून चोरी करत असल्याचं तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल आणि पाहिलं सुद्धा असेल. मात्र तुम्ही कधी चोरट्याला डान्स करताना पाहिलंय का? होय, हे खरंय. आपली चोरी यशस्वी करून झाल्यानंतर हा चोरटा डान्स करू लागला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. हा व्हिडीओ लोक वारंवार पाहत आहेत. सध्या सोशल मीडियावर या डान्सिंग चोराची जोरदार चर्चा आहे.

उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यात घडलेल्या एका अनोख्या चोरीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या चोरीच्या व्हिडीओतील चोराच्या कारनाम्याने सर्वांनाच व्हिडीओ पाहण्यास भाग पाडले आहे.

salman khan reaction on shahrukh khan song
Video: घरावरील हल्ल्यानंतर सलमान खान दुबईत, शाहरुख खानचं गाणं वाजताच भाईजानने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
digit robot collapse after working 20 hours
२० तास काम करून Robot देखील थकून जमिनीवर कोसळला! ‘या’ व्हायरल व्हिडीओची होत आहे चर्चा…
Taiwan Earthquake
Taiwan Earthquake : भूकंपाची चाहूल लागताच कुत्र्याने घरातल्या लोकांना केले सावध, तैवान येथील भूकंपाचा व्हिडीओ व्हायरल
Hardik Malinga Pushing Video Viral
MI vs SRH : हार्दिक पंड्याने लसिथ मलिंगाला ढकलल्याने चाहते संतापले, VIDEO होतोय व्हायरल

आणखी वाचा : चित्ता शिकारीसाठी आला असताना हरणाने अशी उडी घेतली की…, पाहा हा VIRAL VIDEO

या चोरट्याने चंदौली येथील एका हार्डवेअरच्या दुकानाला आपलं टार्गेट बनवून हजारोंचा माल पळवला. यादरम्यान चोरट्याने दुकानात लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा पाहताच तो कॅमेरा बघून नाचू लागला.

आणखी वाचा : तुम्ही कधी इच्छाधारी नागिन पाहिलीय का? मग हा व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच

गेल्या आठवड्यात शुक्रवारी ही घटना घडली होती. धक्कादायक म्हणजे चोरट्याने ज्या दुकानाला टार्गेट बनवलं होतं ते चंदौली इथल्या पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाजवळ आहे. चोरीच्या तक्रारीनुसार चोरट्याने सहा हजार रुपये रोख आणि हजारो रुपयांचा माल चोरून नेल्याचे पोलिसांनी सांगितले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. चोरट्याने हार्डवेअरच्या दुकानात चोरी करण्यासाठी प्रवेश केला होता. चोरीनंतर तो सीसीटीव्ही कॅमेऱ्याकडे वळला आणि डान्स करू लागला.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ‘Kacha Badam’ गाण्यावर महिलेचा हा नागिन डान्स एकदा पाहाच, पोट धरून हसाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

पोलीस तपासात गुंतले
जसुरी गावातील रहिवासी अंशू सिंह यांचे सदर पोलिस स्टेशन परिसरात एसपी निवासस्थानाजवळ हार्डवेअरचे दुकान आहे. शनिवारी सकाळी या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. याबाबत दुकानदाराने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.