Robbery Viral Video: सध्या जगभरातच चोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत. दिवसाढवळ्या चोर लोकांच्या घरात घुसून चोरी करत आहेत; तर कधी रेल्वेमध्ये पाकिटमार, फोन चोरण्याच्या चोरांची दहशत वाढू लागली आहे.

फोन चोरीच्या घटनांशी संबंधित असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना आपण पाहत असतो. सध्या अशीच घटना एका रेल्वेस्थानकावर घडली, जिथे एक व्यक्ती खिडकीतून एका मुलीचा फोन हिसकावताना दिसला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सार्वजनिक वाहतुकीच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे.

Kajol reveals weirdest rumour about her
काजोल प्रवास करत असलेलं विमान क्रॅश झालंय; अभिनेत्रीच्या आईला कोणीतरी फोन करून सांगितलं अन्…; काय घडलेलं?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Woman slaps Telugu actor NT Ramaswamy
Video: …अन् महिलेने भर गर्दीत अभिनेत्याला केली मारहाण, चित्रपट ठरला कारणीभूत; व्हिडीओ झाला व्हायरल
sister brother heart touching video
VIDEO : “मला गिफ्ट नको पण मला वचन दे की दारू कधी पिणार नाही” भावाचा हात धरून रडली बहीण
Viral Video Shows The young man got dizzy in the metro
VIRAL VIDEO : ‘आई कुणाचीही असो…’ मेट्रोमध्ये सगळ्यांनी केलं दुर्लक्ष पण महिलेच्या ‘त्या’ कृतीने जिंकली सगळ्यांची मनं
लेकीला अद्दल घडवण्यासाठी आईने लढवली शक्कल
“चिंची चेटकीण आली फ्रिजमध्ये”, लेकीला अद्दल घडवण्यासाठी आईने लढवली शक्कल, Viral Video पाहून पोट धरून हसाल
cute brother sister video
“माझ्या भावाला मारलंस ना तर…” चिमुकलीने आईशी कचाकचा भांडत दिली धमकी; VIDEO तील निरागसपणा पाहून युजर्स म्हणाले…
funny video goes viral
“शाळेत जात नाही, म्हशी राखते” चिमुकलीने स्पष्टच सांगितले, VIDEO पाहून पोट धरून हसाल

हेही वाचा… काका काय करताय? चालती ट्रेन पकडण्याच्या नादात काकांबरोबर घडलं असं काही की…, VIDEO पाहून तुम्हीही माराल कपाळावर हात

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी ट्रेनमध्ये विंडो सीटवर बसून आपला फोन वापरताना दिसतेय, तर एक माणूस ट्रेनच्या खिडकीला लटकताना दिसत आहे. फोन चोरी करण्याच्या हेतूने आलेला माणूस लहान मुलीचा मोबाइल जबरदस्तीने हिसकावण्याचा प्रयत्न करत आहे. ती लहान मुलगी फोन चोराच्या हाती न लागू देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असते. यासाठी ती त्या चोराच्या हातावरदेखील दोन-तीनदा मारते, पण चोर त्या मुलीचा फोन जबरदस्तीने हिसकावून घेऊन जातो.

दरम्यान, “मम्मी मेरा फोन” असं म्हणत ती आपल्या आईला आवाज देत असते. त्यानंतर सीटवर उभं राहून “मम्मी मेरा फोन ले गया” असं म्हणत ती रडत रडत आईला चोराबद्दल सांगते.

हा व्हिडीओ @ManojSh28986262 या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होतोय. “ट्रेनमध्ये बसलेले असताना काळजी घ्या, बघा चोराने कसा खिडकीतून त्या मुलीचा फोन हिसकावून घेतला. आजकाल फोन चोरीच्या घटना वाढत आहेत”, असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे.

हेही वाचा… “फक्त मुंबईतील लोक…”, मेट्रोत तरुणाबरोबर घडलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने “अशा ठिकाणी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे”, अशी प्रतिक्रिया दिली; तर दुसऱ्याने “व्हिडीओ बनवणारा व्यक्ती त्या मुलीला मदत करू शकत नव्हता का?” अशी प्रतिक्रिया दिली. तर अनेकांनी हे स्क्रिप्टेड वाटतंय असंही सांगितलं.

दरम्यान, ही चोरीची घटना कधी आणि कुठे घडली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. तर ही घटना पाहून सध्या सगळ्यांनाच धक्का बसला आहे. ट्रेनमध्येदेखील आपल्या मौल्यवान वस्तू सुरक्षित नाहीत, याची भीती सगळ्यांना वाटू लागली आहे.