Shocking video: लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडीया घेऊन येत असतात. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. अशातच एका तरुणाने दुकानदारासमोरच अशी चोरी केली आहे की हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चोरीची पद्धत पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. पाहून गोंधळून जाल व्हिडीओ पाहताना नेमकी चोरी झाली कुठे हे पहिल्यांदा पाहिल्यानंतर कळणारच नाही. त्यासाठी व्हिडीओ पुन्हा स्लो-मोशनमध्ये पाहावा लागतो. तेव्हा जाऊन कळतं, की नेमकी चोरी कशी, कोणत्या मिनिटाला केली गेली. सोशल मीडिया हे व्हिडीओ आणि फोटोंचं भांडार आहे,. येथे तुम्हाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल. कारण- येथे अशी एकही गोष्ट नाही; जी तुम्हाला इथे सापडणार नाही. सोशल मीडिया उघडताच आपल्यासमोर वेगवेगळ्या गोष्टींची दालनं खुली होत जातात. त्यामधून पुढे पुढे जाताना आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे; जो पाहून आपल्या लक्षात येईल की, आपल्या आजूबाजूला काय घडत आहे आणि त्यामुळे आपल्याला सतर्क राहण्याची कशी गरज आहे. चोरी करण्याची ‘ही’ पद्धत पाहा या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन तरुण बाईकवरुन येतात आणि एका दुकानाबाहेर थांबतात. यावेळी एक तरुण दुकानात ग्राहक असल्याचे भासवत येतो. आणि त्याच्याबरोबरचा तरुण मागेच गाडीवर थांबतो. पुढे तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता, हा तरुण दुकानदाराला काहीतरी वस्तू मागतो आणि त्याची किंमत विचारतो. दुकानदाराने किंमत सांगितल्यानंतर हा तरुण पैसे कमी करण्यासाठी विनंती करताना दिसत आहे. यानंतर दुकानदार थोडे पैसे कमीही करतो. यावर हा तरुण मागे असलेल्या व्यक्तीकडे पैसे घेण्यासाठी जातोय असं नाटक करत जातो आणि तसाच त्याच्या गाडीवर बसून फरार होतो. यावेळी दुकानदाराला नेमकं पाहा व्हिडीओ हेही वाचा >> आजीबाईंचा नाद नाय; मनोज जरांगेंच्या रॅलीत स्कुटीवरुन मारली जबरदस्त एन्ट्री; नाशिकमधला VIDEO तुफान व्हायरल हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. एकाने म्हंटलं आहे की, "चोरांना वाटले असावे की सीसीटीव्ही नसतील." आणखी एका युजरने "हे कसले चोर, चोरून चोरुन काय चोरलं ?"