scorecardresearch

ऐकावं ते नवलच! चोरट्यांनी पळवला २ किलोमीटरचा रेल्वे ट्रॅक; फोटो होतोय Viral

या चोरीच्या प्रकरणामध्ये चोरट्यांनी कार,बाईक नव्हे तर तब्बल २ किलोमीटर लांबीच्या रेल्वे ट्रॅकची चोरी केली आहे

Bihar samastipur railway news
आजपर्यंत तुम्ही अनेक चोरीच्या घटना ऐकल्या असतील, पण सध्या अशी एक चोरी उघडकीस आली आहे. ती ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. (Photo : Twitter)

आजपर्यंत तुम्ही अनेक चोरीच्या घटना ऐकल्या असतील, पण सध्या अशी एक चोरी उघडकीस आली आहे, जी ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. हो कारण या चोरीच्या प्रकरणामध्ये चोरट्यांनी कार,बाईक नव्हे तर चक्क रेल्वेच्या रुळाची चोरी केली आहे. शिवाय ही चोरी किरकोळ नव्हे तर तब्बल २ किलोमीटरचा रेल्वे ट्रॅक चोरट्यांनी पळवला आहे.

कदाचित या बातमीवर विश्वास ठेवणं तुम्हाला कठिण जाणार आहे. पण असं प्रत्येक्षात घडलं आहे. या विचित्र चोरीची घटना बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यात घडली आहे. चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर रेल्वे प्रशासनाची झोप उडाली आहे. तर सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या चोरीच्या घटनेत रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्याच (RPF) दोन कर्मचाऱ्यांवर चोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हेही पाहा- Video: पापा की परीचा अजून एक कारनामा! बाईकवरून सुसाट जाताना अचानक एकाला दिली धडक अन्…

शिवाय रेल्वे ट्रॅक चोरीला गेल्याचे बातमी समोर येताच विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. या चोरीच्या घटने प्रकरणी रेल्वेने झांझारपूरच्या चौकीचे प्रभारी आणि मधुबनीच्या एका कर्मचाऱ्याला निलंबित केलं आहे. दरम्यान, समस्तीपूर येथील चोरीच्या घटनेचा तपास करण्यासाठी एक उच्चस्तरीय तपास पथक नेमण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समस्तीपूर रेल्वे विभागातील पांडौल स्थानक ते लोहट शुगर मिल दरम्यान रेल्वे ट्रॅक टाकण्यात आला. या मार्गावर गाड्यांची ये-जा नव्हती. या रेल्वे लाईनचा लिलाव होणार होता, मात्र त्याआधीच येथील दोन किलोमीटरच्या रेल्वे ट्रॅक चोरट्यांनी पळवला.

हेही पाहा- बापरे! एकाच वेळी दोन्ही हातांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिते ही मुलगी; व्हायरल video पाहून तुम्हीही व्हाल थक्क

रेल्वे कर्मचाऱ्यांनीच केली चोरी ?

रेल्वे कर्मचाऱ्यांनीच रेल्वे रुळाची चोरी केली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर या घटनेच्या तपासानंतर लगेचच RPF कमांडंट एसजे ए जानी यांनी गतीने चौकशी करत झांझारपूर स्टेशनचे चौकी प्रभारी श्रीनिवास आणि मधुबनी स्टेशनवर ड्युटीवर असणारे आरपीएफ जमादार मुकेश कुमार सिंह यांचं निलंबन केलं आहे. शिवाय या रुळाच्या चोरी प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. तसंच पोलिसांनी आतापर्यंत संशयित पिता-पुत्र अनिल यादव आणि राहुल कुमार यांना ताब्यात घेतले आहे. राहुल कुमार याने साखर कारखान्यात भंगारावर प्रक्रिया करणाऱ्या व्यवसायात मुन्शी म्हणून काम केल्याची माहिती समोर आली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 19:43 IST