‘घेऊन टाक’ म्हणत ‘या’ अमेरिकी माणसाने धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका; Viral Video पाहून तुम्हीही कराल कौतुक

नुकताच संपूर्ण देशात जन्माष्टमी हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. याचनिमित्ताने या इसमाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक नवा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

‘घेऊन टाक’ म्हणत ‘या’ अमेरिकी माणसाने धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका; Viral Video पाहून तुम्हीही कराल कौतुक
या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी भारतीयांना जन्माष्टमीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. (Instagram)

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या गाण्यांच्या रील्स विशेष व्हायरल होत असतात. लोक आपले कलागुण यातून दाखवायचा प्रयत्न करतात. आजकाल बॉलिवूडच्या गाण्यांवर परदेशातील व्यक्तींनी केलेले रील्सही तुफान व्हायरल होत असतात. त्यांची बॉलीवूडच्या गाण्यांबद्दलची क्रेझ पाहून भारतीय लोकांनाही विशेष आनंद होतो.

बॉलिवूडचे चाहते जगभरात पसरलेले आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून ही जवळीक आणखीनच वाढली आहे. जर तुम्ही इन्स्टाग्राम सातत्याने वापरत असाल तर तुम्ही ‘डान्सिंग डॅडी फ्रॉम यूएस’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीचे व्हिडीओ नक्कीच पाहिले असतील. या इसमाचं नाव रिकी पॉण्ड असून ते बॉलिवूडच्या अनेक गाण्यांवर डान्स करताना दिसतात.

“मला कंटाळा आलाय ग अभ्यास करून”; वैतागलेल्या चिमुरडीचा क्युट Video सोशल मीडियावर Viral

नुकताच संपूर्ण देशात जन्माष्टमी हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. याचनिमित्ताने रिकी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक नवा व्हिडीओ पोस्ट केला आहे. अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्या ‘हॅलो ब्रदर’ या चित्रपटातील ‘चांदी की डाल पर सोने का मोर’ गाण्यावर उत्कृष्ट डान्स केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी भारतीयांना जन्माष्टमीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

चार पायांवर चालणाऱ्या सापाला पाहून नेटकरीही पडले बुचकळ्यात; हा Viral Video एकदा पाहाच

दरम्यान, नेटकऱ्यांना रिकी यांचा डान्स फारच आवडला आहे. रिकी यांनी यापूर्वीही अनेक बॉलिवूडच्या गाण्यावरील डान्सचे व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. ते अनेकदा इन्स्टाग्रामवर व्हायरल गाणी आणि सदाबहार बॉलिवूड गाण्यांवर डान्स करत त्याचे व्हिडीओ बनवताना दिसतात. त्यांच्या या व्हिडीओला अवघ्या ८ तासांत जवळपास १९ हजार लाइक्स मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: This american man dance bollywood song gheun taak you will also appreciate watching viral video pvp

Next Story
फिनलॅण्डच्या महिला पंतप्रधानांच्या Party Dance वरुन वाद पण ‘या’ नेत्यांचे डान्सही झालेले व्हायरल; पाहा Videos
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी