दैनंदिन जीवनात लागणाऱ्या जवळपास सर्वच गोष्टी पैशांवर अवलंबून असतात. जीवनशैली सुधारण्यासाठी प्रत्येक जण काबाडकष्ट करुन श्रीमंत होण्याच प्रयत्न करतो. काही जण बेकायदेशीरपणे झटपट श्रीमंत होण्याच प्रयत्नही करतात. पण एक गोष्ट तुम्हाला माहितेय का? श्रीमंत झाल्यावर अनेक जण समाजासमोर डौलाने मिरवतात. पण गरिबी असली तर काहींना परिस्थिती सांगण्यास कमीपणा वाटतो. पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळं नेटकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण एका एटीएम मध्ये कोणत्या माणसाकडे किती पैसै आहेत, याचा संपूर्ण हिशोब दाखवला जात आहे. ज्या ग्राहकांनी या एटीएम मध्ये जाऊन पैसे काढले, त्यांना त्यांच्या खात्यातील शिल्लक रक्कमेचा तपशील तर मिळतोच, पण इतरांच्याही खात्यातील पैशांचा हिशोब समजतो.

ही एटीएम मशिन अमेरिकेतल्या मिआमी समुद्र किनाऱ्यावर आहे. या एटीएम मध्ये पैसे काढायला गेलेल्या ग्राहकांच्या खात्यातील शिल्लक रक्कम सार्वजनिकपणे इतरांना दाखवली जाते. पैशांची शिल्लक कुणाकडे किती आहे, कुणाकडे सर्वात जास्त पैसे आहेत, याचा संपूर्ण तपशील या एटीएम मशिनमध्ये दाखवला जातो. या मशिनचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनाही धक्काच बसला आहे.

a Disabled man climbs kille raigad
खरा शिवप्रेमी! कुबड्या हातात घेऊन सैर केला रायगड, अपंग व्यक्तीचा व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल भावूक
girls presents old famous advertisement video goes viral on social media
90’s चा काळ कधी परत येणार नाही! तरुणींनी दाखवली जुन्या लोकप्रिय जाहिरातींची झलक, Video एकदा पाहाच
a young girl eating worms like farsan chiwada shocking video goes viral on social media
Video : बापरे! तरुणी फरसाणसारख्या आवडीने अळ्या खातेय; व्हिडीओ पाहून येईल किळस
watch jugaad viral video
बजाजवाल्यांनी कधी विचारही केला नसेल की स्कुटरचा असा होईल उपयोग, जुगाड पाहून तुम्हीही व्हाल अवाक्, पाहा व्हिडीओ

नक्की वाचा – भयंकर! आईने पोटच्या लेकराच्या डोळ्यात टाकली मिरची पावडर, कारण वाचून धक्काच बसेल, Video होतोय तुफान Viral

इथे पाहा व्हिडीओ

इन्स्टाग्रामवर शेअर केलेला या व्हिडीओ मध्ये लोक एटीएम मशिनच्याजवळ गर्दी करत असल्याचं दिसत आहे. अनोळखी व्यक्तींचा फोटो आणि त्यांच्या खात्यातील शिल्लक रक्कम या मशिनद्वारे दिसत आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्राम युजर जोएल फ्रांको यांनी शेअर केला आहे. जवळपास दोन हजारांहून अधिक व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. तसेच नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षावही केला आहे. एका युजरने म्हटलं, हे खूप भयंकर आहे, तुमचा बॅंक बॅलेंस पाहिल्यानंतर एखादा माणूस तुमचा पाठलाग करून हायजॅक करण्याचा प्रयत्न करु शकतो.