इंग्रजी ही अशी भाषा आहे जी आजच्या काळात सर्वत्र सर्रास वापरली जाते. जवळपास प्रत्येक क्षेत्रामध्ये इंग्रजी भाषेमध्ये काम करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पण अजून भारतामध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांनी इंग्रजी भाषा व्यवस्थित बोलता येत नाही. भल्या भल्यांची इंग्रजी बोलताना बोबडी वळते. पण काही लोक कोणतेही शिक्षण न घेताही फाडफाड इंग्रजी बोलताना दिसतात. अशाच एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. व्हिडीओ पाहून लोक थक्क झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंस्टाग्रामवर der_alpha_mannchen नावाच्या अकांऊटवर पोस्ट केला आहे. व्हायरल व्हिडीओ गोव्यातील बागा म्हणजे वागातोर बीचवरील आहे. व्हिडीओमध्ये एका बांगड्या, ब्रेसलेट आणि नेकलेस विकणारी महिला फाडफाड इंग्रजी बोलताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ही महिला करोनानंतर समुद्रकिनाऱ्यावर झालेल्या बदलांबाबत तिची निरीक्षणे मांडत आहे ते इंग्रजी भाषेमध्ये.

काळ्या खडकांसाठी आणि स्वच्छ पाण्यासाठी ओळखला जातो. गोव्यामधील गर्दीने गजबजलेल्या समुद्रकिनाऱ्यांपासून दूर शांतता शोधणाऱ्या पर्यटकांसाठी आवडीचे स्थान आहे. व्हिडिओमध्ये ही महिला बांगड्या आणि नेकलेस विकताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये समुद्रकिनाऱ्यावरील बदलत्या स्थितीचे वर्णन या महिलेने चक्क इंग्रजी भाषेमध्ये उत्तम प्रकारे केले आहे.

हेही वाचा – दुचाकीच्या चाकात अडकला महिलेचा पदर, सफाई कर्मचाऱ्याने केली मदत; काकांच्या माणुसकीने जिंकले सर्वांचे मन!

हेही वाचा – आयुष्यात इतकं श्रीमंत व्हायचंय! कचरा टाकण्यासाठी हेलिकॉप्टरमधून पोहोचला अन्..; VIDEO पाहून व्हाल थक्क

व्हिडिओला ८२८ हजारांहून अधिक लाईक्स आणि अनेक कमेंट्स केल्या आहेत. या महिलेचे इंग्रजी भाषा ऐकून लोक खूप प्रभावित झाले आहेत. समुद्रकिनाऱ्यांवर होणाऱ्या साक्षीदार असलेली ही महिला तिचे मत इंग्रजी मांडताना आजिबात अडघळत नाही. तिच्या मतांवरून तिची फक्त तिचे इंगजीच नव्हे तर तिची निरिक्षण क्षमता देखील चांगले आहे हे दिसते. लोकांनी महिलेचे कौतूक केले आहे. व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने लिहले की, तिच्या अचूक आणि सहज इंग्रजी बोलण्याचे कारण म्हणजे ती आमच्यासारखे इंग्रजी शाळेत शिकली नाही, परंतु तिने ते आत्मसात केले आणि ज्यांची पहिली भाषा इंग्रजी आहे त्यांचे अनुकरण करून मुले जसे त्यांच्या मातृभाषेचे करतात…त्याचे कौतुक करा” दुसऱ्याने लिहिले की, “आज खऱ्या अर्थाने इंग्रजी ही एक फक्त भाषा आहे हे सिद्ध झालं…”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This bangle seller from goa has charmed the internet with her fluent english snk
First published on: 04-02-2024 at 10:00 IST