सहसा लांब पल्ल्याच्या विमानांनाही उड्डाण करताना एकदा तरी उतरावे लागते, मात्र एका पक्ष्याने असा हवाई प्रवास केला आहे, ऐकून तुम्ही थक्क व्हाल. वास्तविक एका पक्ष्याने अलास्का ते ऑस्ट्रेलिया असा १२,८७४ किमी नॉन स्टॉप प्रवास केला आहे.

बार-टेल्ड गॉडविट नावाच्या या पक्षाची तुलना त्याच्या आकारासाठी लढाऊ विमानाशी केली गेली आहे. या न थांबता प्रवासासोबतच त्या पक्ष्याने पुन्हा एकदा स्वतःचाच विश्वविक्रमही मोडला आहे.

( हे ही वाचा: १३ कोटी भरून मॉडेलने ‘या’ विशेष भागाचा उतरवला विमा! कारण जाणून वाटेल आश्चर्य )

कसा केला प्रवास?

ट्रॅकरचा वापर पक्ष्याच्या शरीरातील वेग आणि अंतर मोजण्यासाठी केला जात होता. हा पक्षी १७ सप्टेंबर रोजी यूएस सोडलं आणि १० दिवसांनी खाली येण्यापूर्वी २३९ तास उड्डाण केले.

पक्षाची खासियत

गॉडविटने गेल्या वर्षी अलास्का ते न्यूझीलंडला नॉन-स्टॉप उड्डाण करून विश्वविक्रम मोडला. ४०० ग्रॅम वजनाचा हा पक्षी जगभरात लांब उड्डाणांसाठी ओळखला जातो आणि तो अन्नातील कीटक खातो.

( हे ही वाचा: T20 WC: पाकिस्तानच्या चाहत्यांकडून धमक्यांच्या बातम्यांवर हसन अलीच्या पत्नीने केली सोशल मीडियावर पोस्ट, म्हणाली…)

या पक्ष्याबद्दल शास्त्रज्ञांचा दावा आहे की त्याचा आकार उडणाऱ्या फायटर प्लेनसारखा आहे आणि लांब टोकदार पंख हवेत वेगाने उडण्याची क्षमता देतात.

मिळालेल्या माहितीनुसार, हा पक्षी प्रवासादरम्यान काहीही खात-पीत नाही. याआधीही या पक्ष्याने अनेक हजार किलोमीटर सतत उड्डाण करण्याचा विक्रम केला आहे.