श्रीकृष्णाची जयंती १९ ऑगस्ट म्हणजेच आज संपूर्ण भारतात मोठ्या थाटामाटात साजरी केली जात आहे. भजन, कीर्तन गात भाविक मध्यरात्रीपासून श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करत आहेत. सोशल मीडियावरही जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने देवाला प्रसन्न करण्यात व्यस्त आहे आणि याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसत आहे. माणसं देवाची भक्ती करतानाचे व्हिडीओ आपण भरपूर पाहिले असतील. मात्र, सध्या सोशल मीडियावरती एका भक्ताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या भक्ताचा व्हिडीओ बघून सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. कारण हा भक्त कोणी माणूस नसून एक पक्षी आहे. होय, सध्या एका पक्षाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड चर्चेत आहे ज्यामध्ये हा पक्षी भगवान कृष्णाचा जप करताना दिसत आहे.

असे अनेक पक्षी आहेत, जे माणसांच्या बोलण्याचे हुबेहूब अनुकरण करतात. त्यापैकी पोपट तुम्हाला चांगलाच माहीत असेल. पण अजून एक पक्षी आहे, जो आपल्या आजूबाजूला असतो, पण तो माणसांप्रमाणेच पोपटा सारखा बोलू शकतो हे तुम्हाला माहीत नसेल आणि तो पक्षी म्हणजे मैना. सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये एक व्यक्ती ‘हरे कृष्ण, हरे कृष्ण’ म्हणताना दिसत आहे. हा व्हिडीओ कुणाच्या तरी घरचा आहे, जिथे घरच्यांनी मैनेला पाळले आहे. काही लोक ‘हरे कृष्णा, हरे कृष्णा’ म्हणत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे, त्यानंतर पाळीव मैना देखील त्याची पुनरावृत्ती करताना दिसत आहे.

( हे ही वाचा: वराने लग्नात केले असे कृत्य की वधूसोबत नातेवाईकांनाही बसला धक्का; पहा हा VIRAL VIDEO)

‘हरे कृष्णा’चा जप करणाऱ्या मैनेचा व्हिडीओ येथे पहा

(हे ही वाचा: मुस्लिम वृद्धाने मधुर आवाजात गायले संस्कृत श्लोक; Viral Video पाहून तुम्हीही व्हाल मंत्रमुग्ध)

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, खोलीच्या फरशीवर मैना बसला आहे. एक व्यक्ती त्याचा व्हिडिओ बनवत असताना तो ‘हरे कृष्ण’ म्हणतो. त्यानंतर मैना देखील त्याच्या मागोमाग ‘हरे कृष्ण, हरे कृष्ण’ म्हणू लागते. यानंतर ती व्यक्ती मैनेसमोर ‘हरी बोल’ म्हणते. ज्याची मैना स्वतःच्या शैलीत पुनरावृत्ती करते.

( हे ही वाचा: ‘माणसाचं वय सांगते’ हे अद्भुत पेंटिंग; विश्वास बसत नसेल तर हा Viral Video एकदा पहाच)

हा व्हायरल होत असलेल्या पक्षाचा व्हिडीओ स्पिरिच्युअल युनिव्हर्स नावाच्या चॅनलवरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘पक्षी ‘हरे कृष्ण, हरे कृष्ण’ चा जप करत आहे.