'This' couple became millionaires because of the backyard swimming pool; You will also be amazed by the earnings | Loksatta

अंगणातील स्विमिंग पूलमुळे ‘हे’ जोडपं झालं कोट्याधीश; कमाई पाहून तुम्हीही व्हाल थक्क

या व्यक्तीने स्विम्प्ली नावाच्या प्लॅटफॉर्मद्वारे आपला स्विमिंग पूल अनोळखी लोकांना भाड्याने देऊन अवघ्या दोन वर्षांत तब्बल एक लाख ७७ हजार डॉलरची कमाई केली आहे.

अंगणातील स्विमिंग पूलमुळे ‘हे’ जोडपं झालं कोट्याधीश; कमाई पाहून तुम्हीही व्हाल थक्क
जिम बॅटन नावाच्या व्यक्तीने २०१२ मध्ये वेस्ट लिन येथील त्याच्या घराबाहेर एक लक्झरी पूल बांधण्यासाठी तब्बल एक लाख दहा हजार डॉलर खर्च केले होते. (Photo : swimply)

पोर्टलॅंड, ओरेगॉनमध्ये राहणाऱ्या जुम बॅटन नावाच्या व्यक्तीने २०१२ मध्ये वेस्ट लिन येथील त्याच्या घराबाहेर एक लक्झरी पूल बांधण्यासाठी तब्बल एक लाख दहा हजार डॉलर खर्च केले होते. एवढे पैसे खर्च करत असताना, यातून भविष्यात आपल्याला भरपूर पैसे मिळतील याची त्याला खात्री होती.

आता, या व्यक्तीने स्विम्प्ली नावाच्या प्लॅटफॉर्मद्वारे आपला स्विमिंग पूल अनोळखी लोकांना भाड्याने देऊन अवघ्या दोन वर्षांत तब्बल एक लाख ७७ हजार डॉलरची कमाई केली आहे. सीएनबीसीनुसार, बॅटनने सांगितले की सप्टेंबर २०२० पासून, त्याने स्विम्प्ली प्लॅटफॉर्मद्वारे अंदाजे ९,००० स्वीमर्सना त्याचा पूल भाड्याने दिला आहे.

बॅटन त्यांचा १५,००० गॅलन क्षमतेचा पूल किमान ५ स्वीमर्ससाठी प्रति तास ७५ डॉलरच्या शुल्काने भाड्याने देतो. पाचपेक्षा जास्त असलेल्या प्रत्येक स्वीमरसाठी ते अतिरिक्त १० डॉलर प्रति तास आकारतात. पूल मध्ये जास्तीत जास्त २३ स्वीमर्स पोहू शकतात. पूल २६ X १८ फूट इतका आहे. त्याचा सर्वात कमी खोलीचा भाग ३.५ फूट खोल आहे तर पूलचा सर्वात खोल भाग ६ फूट आहे.

Viral Video : ट्रकला वाचवण्याच्या प्रयत्नात क्रेनही पडली नदीत; धक्कादायक अपघात कॅमेरात कैद

जिमने डेली मेलला सांगितले की, हा पूल दोन एकर जागेवर घरामागील अंगणात तयार केला आहे आणि त्याच्याभोवती झाडे आहेत. तापमान नियंत्रणात ठेवण्याची व्यवस्था करण्यात आल्याने थंडीच्या वातावरणातही लोक येथे पोहू शकतात, असे या जोडप्याने म्हटले आहे. या पूलचे तापमान ९० ते १०४ अंशांपर्यंत ठेवता येते. पूल सोबतच अनेक सुविधा आहेत. येथे टॉयलेटसह एक गरम पूल हाऊस आहे. यासोबतच एक स्वतंत्र चेंजिंग रूम देखील आहे. स्विमिंग पूलसह स्पा जेट आणि बबलर्स आहेत जे रिमोट कंट्रोलने नियंत्रित केले जाऊ शकतात.

मात्र, आपल्या घराचा पूल भाड्याने देणे वाटते तितके सोपे नाही. जिम म्हणतो की, त्याने गेल्या दशकात देखभालीसाठी अंदाजे ३७ हजार डॉलर खर्च केले आहेत. पाण्यातील साफसफाई आणि त्यातील केमिकल्सची चाचणी करण्यापासून ते सर्व बुकिंग मॅनेज करण्यापर्यंत, बॅटन आणि त्याची पत्नी, लिसा बॅटन, दर आठवड्याला अंदाजे १२ ते १४ तास वेळ देतात. पाणी शुद्ध करताना ते इंटेलिकेम ऑटोमेटेड लिक्विड आणि टॅब्लेट क्लोरीन फीडर वापरतात तर जागा निर्जंतुक करण्यासाठी अल्ट्राव्हायोलेट लाइट वापरतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मैत्रिणींनो ऐकलंत का? 25 रुपयात कोणतीही साडी न्या, उल्हासनगर मधील हा Sale चर्चेत

संबंधित बातम्या

Zombie Virus: रशियात सापडला ४८ हजार ५०० वर्षांपूर्वीचा ‘झोम्बी व्हायरस’; करोनापेक्षाही भयंकर संसर्ग लाटेची वैज्ञानिकांना भीती
शेतकऱ्याचा नादच खुळा! शेतात आलेल्या सिंहिंणींना दिलं जशाच तसं उत्तर, Viral Video पाहून म्हणाल ‘कमाल है’
कर्म तैसे फळ! मोराच्या अंड्यांची चोरी करायला गेलेल्या चोराला घडली जन्माची अद्दल; पाहा Viral Video
Video: पर्यटकांना वाघाला जवळून पाहण्याचा मोह नडला! वाघ अचानक उड्या मारत आला अन…
Video: रेल्वे कर्मचाऱ्याची हात चलाखी…; तिकीट काऊंटरवरील ‘हा’ व्हिडिओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“आमच्या सर्वांची भूमिका राज्यपालांना समर्थन करणारी नाही, पण…”; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान!
“मी टीकेचा धनी…” सिद्धार्थ जाधवने केले सिनेसृष्टीतील ट्रोलिंगवर भाष्य
IND vs NZ 3rd ODI: श्रेयस अय्यरने रचले अनेक विक्रम; ३४ वर्षांनंतर केला ‘हा’ नकोसा पराक्रम, घ्या जाणून
गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी लवकरच ‘दुर्ग प्राधिकरणा’ची स्थापना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा!
मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्त्यात ‘या’ चुका अजिबात करू नका; नाहीतर दिवसभर Blood Suagr वाढलेली राहील