मुलाचे मोबाईल व्यसन सोडवण्यासाठी वडिलांनी लढवली अनोखी शक्कल

फोन पासून दूर राहिल्याने त्यांच्या मुलाची चिडचिड होत असे

आजकाल मुलांना मोबाईलचे व्यसन पटकन लागते आणि हे व्यसन सोडवण्यासाठी त्यांचे आई-वडिल खडतर प्रयत्न करताना दिसतात. अशाच एका वडिलांनी त्यांच्या मुलाचे मोबाईलचे व्यसन सोडवण्यासाठी अनोखी शक्कल लढवल्याचे समोर आले आहे. वडिलांनी केलेल्या उपायामुळे त्यांच्या मुलाची मोबाईल वापरण्याची सवय कमी झाली असून मुलगा कुटुंबीयांसोबत वेळ घालवू लागला आहे.

कॅनडातील कॅलगरीमध्ये राहणाऱ्या जेमी क्लॉर्क यांच्या १८ वर्षीय मुलाला खोबेला मोठ्या प्रमाणावर मोबाईल वापरण्याची सवय होती. तो दिवसभर गेम खेळायचा तसेच सोशल मीडियाचा वापर देखील मोठ्या प्रमाणावर करायचा. त्याची मोबाईलची सवय कमी करण्यासाठी जेमीने अनेक प्रयत्न केले. पण त्याची सवय काही कमी होईना. शेवटी जेमीने एक वेगळी शक्कल लढवली.

जेमी खोबेला कॅनडापासून जवळपास ८००० किमी लांब मंगोलियाला घेऊन गेला. तेथे कोणतीही बस सेवा तसेच इंटरनेट सेवादेखील उपलब्ध नव्हती. जेमी आणि खोबे तेथे महिनाभर होते. या एका महिन्याच्या कालावधीमध्ये त्या दोघांनी बाईक रायडिंग, हॉर्स रायडिंग तसेच टेंटमध्ये राहण्याचा अनुभव घेतला. दरम्यान खोबेच्या सवयी बदलू लागल्या. तो मोबाईलपासून दूर राहू लागला.

या प्रवासाने खोबेचे संपूर्ण आयुष्य बदलले असल्याचे त्याने सांगितले. यापूर्वी तो सतत फोन वापरायचा. फोनचे नेटवर्क गेले किंवा फोन न वापरल्यास त्याची चिडचिड व्हायची. पण आता त्याच्या या सर्व सवयी बदलल्या आहेत. तो कुटुंबीयांसोबत वेळ घालवू लागला आहे. जेमी हे गिर्यारोहक आहेत. मोबाईलच्या जास्त वापरामुळे मुलांना त्याचे व्यसन लागते. त्यामुळे मुलांना मोबाईलपासून जेवढं लांब ठेवता येतील तेवढं ठेवा. त्यांना नवीन गोष्टी करण्यासाठी प्रेरित करा असे जेमी यांनी म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: This dad took his son to mongolia just to get him off from cell phone avb

Next Story
VIDEO : ‘धीरे धीरे’ गाणे तेही संस्कृतमध्ये ऐकलेत का तुम्ही?