पृथ्वीवरील धूळ, चिखल, खडक, दगड, खनिज, पदार्थ आणि धातू ही सर्व पृथ्वीचीच रूपे आहेत. काही ठिकाणी ती हिरवीगार शालूत नटलेली असते, तर कधी ती थंडगार बर्फाने माखलेली असते. पण कधी कधी कडाक्याच्या उन्हामुळे अनेकजणांना पृथ्वीचा रागसुद्धा पहायला मिळतो. पृथ्वीची ही विविध रुपं आपण पाहत आलो आहोत. मात्र, सध्या पृथ्वीचे एक रौद्र रुप सर्वांनाच चकित करत आहे. आईसलँड या देशात गेल्या ८०० वर्षांपासून शांत असलेला ज्वालमुखी उसळल्याचं पाहून सगळेच अवाक् झाले आहेत. या ज्वालामुखीतून एवढा लाव्हा बाहेर पडत आहे की पर्वतावरून अक्षरशः लाव्हाच्या नद्या वाहत आहेत. हा ज्वालामुखी आकाशातून कसा दिसत असेल ? हे दाखवणारा ज्वालामुखीचा ड्रोन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या ज्वालामुखीचा हा ड्रोन व्हिडीओ ‘गुड न्यूज करस्पाँडंट’ने ट्विटरवर शेअर केलाय. ज्वालामुखीचा हा ड्रोन व्हिडीओ पाहून तुम्ही थक्क व्हाल. होरडर क्रिस्टलीफसनने त्यांच्या ड्रोनमधून कॅप्चर केलेले हे दृश्य पाहणाऱ्या प्रत्येकाला एक वेगळाच अनुभव देत आहे. फुटणाऱ्या ज्वालामुखीचा व्हिडीओ इतक्या जवळून पाहताना पाहण्याऱ्यांच्या अंगावर शहारे येत आहेत. जणू काही लाल सूर्याचा गोळाच फुटून त्यातून आगीची नदीच वाहतेय, असा भास होतो.

The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?
nature-loving rickshaw driver put Plants in rickshaw
“किती सुंदर दादा!”, निसर्गप्रेमी रिक्षचालकाचा हटके जुगाड पाहून प्रवासी झाले खुश, व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच
Hardik Malinga Pushing Video Viral
MI vs SRH : हार्दिक पंड्याने लसिथ मलिंगाला ढकलल्याने चाहते संतापले, VIDEO होतोय व्हायरल
people washing plates in fountain in wedding
Viral Video : लग्नात सजावटीसाठी लावला होता पाण्याचा कारंजा, पण लोकांनी जेवणाची ताटं धुतली, एकदा व्हिडीओ पाहाच

आइसलँडची राजधानी रेक्यावीकजवळ दक्षिण पश्चिम भागात असलेल्या रेक्येनीस पेनिनसुलामध्ये हा ज्वालामुखी फुटला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ८.४५ वाजता या ज्वालामुखीचा उद्रेक झाला. गेल्या ८०० वर्षापासून हा ज्वालामुळी निद्रिस्त होता. मात्र आता यावर एक मोठा विस्फोट झाल्यामुळे त्यातून आता तो पर्वताच्या दुतर्फा लाव्हाच्या नद्या वाहू लागल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या ड्रोन व्हिडीओमध्ये सुरुवातीला झालेला स्फोट लहान दिसतो. पण विस्फोटानंतर त्यातून निघणाऱ्या लाव्हा एका नदीप्रमाणे पुढे पुढे सरकत खूप मोठ्या परिसरात म्हणजे जवळपास ३२ किलोमीटर दूरपर्यंत पसरू लागल्या आहेत. या ड्रोन व्हिडीओमध्ये सर्व परिसर लालेला आणि केशरी रंगात दिसत असल्याचं तुम्ही पाहू शकता.

आणखी वाचा : VIRAL : प्रामाणिक कुत्र्यानेच घेतला मालकीणीचा जीव, गळ्यावर वार करत महिलेला यमसदनी धाडलं…

इथे पाहा व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा : भूतासोबत खेळताना कुत्र्याचा VIDEO VIRAL? ; भयानक दृश्य CCTV कॅमेऱ्यात कैद, पाहून घाबरून जाल

ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर फोटोग्राफर होरडर क्रिस्टलीफसन यांनी आपला ड्रोन कॅमेरा ज्वालामुखीजवळ पाठवला. त्याचवेळी क्रेटर रिमचा काही भाग कोसळला. हा भाग ‘छोटा’ दिसत असला तरी प्रत्यक्षात तो पाच मजली इमारतीच्या आकार एवढा आहे. माउंट फॅग्राडॉसफियाक ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे १६४० फूट उंचीवर लाव्हा उसळल्या होत्या. या ज्वालामुखीतून चार दिवसांत १० दशलक्ष चौरस फूट लाव्हा बाहेर पडला.

ज्वालामुखीचा हा ड्रोन व्हिडीओ पाहून कुणाचा थरकाप उडतो तर कुणाला मजाही वाटू शकते. तीन दिवसांपूर्वी हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. अवघ्या तीन दिवसांत या व्हिडीओला आतापर्यंत आठ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर ज्वालामुखीचा लाव्हारस पहिल्यांदा इतक्या जवळून पाहिल्याचा अनुभव व्यक्त केला आहे.