Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ अंगावर काटा आणणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जळत्या अपार्टमेंटमध्ये अडकलेल्या एका माणसाचा जीव वाचवताना शेजारी दिसत आहे. शेजाऱ्यांनी पाळलेला हा माणुसकीचा धर्म पाहून तुम्हीही भावूक व्हाल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

असं म्हणतात, पहिला सख्खा शेजारी असतो कारण कोणतीही अडचण आली तरी शेजारी धावत येतात आणि मदत करतात. कोणत्याही चांगल्या वाईट प्रसंगी मित्र आणि नातेवाईक यायला वेळ लागतो पण शेजारी मात्र वेळेत हजर राहतात. सध्या या व्हायरल व्हिडीओमध्ये माणुसकी दाखवत एकजुटीने शेजारच्या लोकांनी एका माणसाचा जीव वाचवला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका अपार्टमेंटमध्ये आग लागली आहे आणि एक माणुस या जळत्या अपार्टमेंटमध्ये अडकला आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की हा माणुस अपार्टमेंटच्या खिडकीत कसाबसा पोहचतो तेव्हा शेजारचे लोक धावत येतात आणि इमारतीखाली उभी असलेली कार एकजुटीने बाजूला करतात. जेव्हा तो माणुस खिडकीतून उडी मारतो तेव्हा शेजारचे लोक एका मोठ्या चादरमध्ये त्याला झेलतात आणि त्याचा जीव वाचवतात. लोकांच्या मदतीमुळे त्याला जीवदान मिळते. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. त्याचबरोबर त्याचा जीव वाचवणाऱ्या लोकांचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहेत.

Man Sexually Assault Dogs
रस्त्यात श्वानांच्या प्रायव्हेट पार्ट्सला हात लावणाऱ्या विकृताचा Video व्हायरल; लहान मुलगी अत्याचार पाहून थांबवायला गेली पण..
How to save people who are swept away by floods
लोणावळ्यासारखी दुर्घटना तुमच्याबरोबर घडली तर काय कराल? पुरात अडकल्यास फक्त ‘ही’ एक कृती मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढेल, पाहा VIDEO
Trainee pratiksha bhosle police officer commits suicide due to lover betrayal Nagpur
प्रियकराने दगा दिल्यामुळे प्रशिक्षणार्थी महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या
Last year, a video clip emerged which showed Tibetan spiritual leader Dalai Lama purportedly kissing a boy on his lips and it sparked outrage.
दलाई लामांनी लहान मुलाला किस केल्याचं प्रकरण, POCSO अंतर्गत कारवाईची मागणी न्यायालयाने फेटाळली
Investigation closed by ED too Failure to trace the source of income in the offenses against the vicar
‘ईडी’कडूनही तपास बंद? वायकर यांच्या विरोधातील गुन्ह्यांत उत्पन्नाचा स्राोत शोधण्यात अपयश
Kotak Group is the beneficiary of Adani stock fall The Hindenburg revelations claim that the costs outweigh the benefits
‘के’ म्हणजे कोटक समूहच अदानींच्या समभाग पडझडीची लाभार्थी! हिंडेनबर्गच्या खुलाशात नफ्यापेक्षा खर्चच अधिक झाल्याचा दावा
man commits suicide due to wifes immoral relationship
पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीची आत्महत्या
Two youths at a party at L3 Bar on Ferguson Street admitted to taking drugs at the bar pune
अमली पदार्थांचे सेवन केल्याची दोन तरुणांची कबुली; चित्रफितीतील ‘त्या’ तीन तरुणांना शोधण्यात अद्याप अपयश

हेही वाचा : सत्तेचे भुकेले! महाराष्ट्रातील सत्य परिस्थिती दाखवणारा तरुणाचा रॅप होतोय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : “४० वर्षे झाली आमची युती आहे, जमत अजिबात नाही..” आजोबांनी थेट बायकोसमोरच सांगितले, पाहा VIDEO

sachkadwahai या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मंगोलियामध्ये लोकांनी एका व्यक्तीला जळत्या अपार्टमेंटमधून वाचवले. त्यांनी एक कार बाजूला केली आणि त्याला वरून झेलण्यासाठी चादरचा वापर केला. अप्रतिम टीमवर्क दिसून आले.”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “याला माणुसकी म्हणतात” तर एका युजरने लिहिलेय, “खूप चांगल्या प्रकारे सुटका केली. सर्व शेजाऱ्यांचा आदर करतो” आणखी एका युजरने लिहिलेय, “मला माणुसकी आवडली” अनेक युजर्सनी या शेजारच्या लोकांवर कौतुकाचा वर्षाव केला आहेत.