Viral Video : नवरा बायकोचं नातं हे जगावेगळं असतं. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी दिसून येते. लग्न करताना दोन व्यक्ती एकत्र येतात आणि नव्या आयुष्याची सुरूवात करतात आणि एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचे वचन देतात. पावलोपावली एकमेकांचा आधार बनतात. नवरा बायकोच्या नात्यात वयानुसार प्रेम वाढत जातं. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक वृद्ध जोडपं बससलेलं दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की आजोबा आजीचे वाढलेली नखं कापत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (This is True Love: Elderly Man Cuts Wife’s Nails in Viral Video – Love Grows with Age)

आजी आजोबांच्या नात्यातील प्रेम

असं म्हणतात, प्रेम हे वयानुसार वाढत जातं. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एका वृद्ध जोडप्यामध्ये असलेले प्रेम दिसून येईल. या व्हायरल व्हिडीओमध्ये आजोबा आजीचे वाढलेली नखं कापताना दिसत आहे. आजोबा अत्यंत सावधगीरीने आणि मन लावून नखं कापताना दिसतात. या व्हिडीओवर एका तरुणाने व्हॉइस ओव्हर दिला आहे.. “३६ गुण जुळून काहीच फायदा नसतो. जर नवरा बायकोचं नातं आयुष्यभर टिकवायचं असेल ना तर प्रेम, काळजी, जबाबदारी आणि आदर हे चार गुण जुळणं फार गरजेचं आहे” हा व्हिडीओ पाहून काही लोकांना त्यांच्या आजी आजोबांची आठवण येईल तर काही लोकांना त्यांच्या जोडीदाराची आठवण येईल.

हेही वाचा : VIDEO: धुळीने माखलेला पंखा स्वच्छ करायची सोपी ट्रिक, हात न लावता होईल साफ; महिलेचा जुगाड पाहून नेटकरी म्हणाले, ‘आतापर्यंत दोन…’

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

हेही वाचा : “ज्योतिबाच्या नावानं चांगभलं” गुलाल अन् सासनकाठीसह बाप्पाच्या सजावटीमध्ये कोल्हापूरच्या ज्योतिबा यात्रेचा नयनरम्य देखावा; VIDEO पाहून नेटकरी अवाक्

anujdawangepatil या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “नकळत काढलेला हा व्हिडिओ आहे खूप छान भारी वाटलं बघून” तर एका युजरने लिहिलेय, “शेवटपर्यंत एकमेकांबरोबर आयुष्य खुप कठीण असतं” आणखी एका युजरने लिहिलेय, “आयुष्यातील पहिले दोन मित्र म्हणजे आजी/बाबा” एक युजर लिहितो, “खुप आनंद वाटला आज्जी बाबा ना पाहून” तर एक युजर लिहितो, “खूप छान, असे नवरा बायको आताच्या पिढीत बघायला नाही भेटत” अनेक युजर्सनी या व्हिडीोओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.