Employee manager fight for sick leave : “अहो बॉस, आम्ही माणसं आहोत, मशीन नाही!” हा प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मनातील एक आतला आवाज आहे जो कॉपेरेट जगात दाबला जात आहे. ऑफिसमध्ये कामाचा ताण आणि डेडलाईन्स नवीन नाहीत, पण जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याच्या हक्काच्या ‘सिक लीव्ह’ (Sick Leave) घेण्यासाठी देखील मॅनेजरकडून आडकाठी केली जाते, तेव्हा संताप अनावर होणारच! आजच्या कॉर्पोरेट जगातंल हे कडू सत्य दाखवणारी पोस्ट सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.

एका आजारी कर्मचाऱ्याने सुट्टी मागितली असता, “काम महत्त्वाचं (Critical) आहे, त्यामुळे एखादी मोठी इमर्जन्सी असल्याशिवाय सुट्टी मंजूर होणार नाही” असं उत्तर मॅनेजरने दिलं. मॅनेजरच्या या मेसेजमुळे “आता आजारी पडणं ही सुद्धा इमर्जन्सी नाही का?” असा थेट आणि संतप्त सवाल प्रत्येक नोकरदार विचारू लागलाय.

काय आहे नेमकं प्रकरण? (What is the exact matter?)

त्याचं झालं असं की, एका कर्मचाऱ्याची तब्येत फार बिघडली होती, म्हणून त्याने रीतसर ऑफिसमध्ये रजेसाठी (Sick Leave) मेसेज केला. पण मॅनेजरने रजा मंजूर करायच्या ऐवजी त्याला थेट कंपनीच्या नियमांचं ज्ञान पाजळलं.

मॅनेजरने मेसेज केला, “सध्या ऑफिसमध्ये ‘क्रिटिकल फेज’ (खूप महत्त्वाचं काम) सुरू आहे. त्यामुळे कोणतीही मोठी इमर्जन्सी असल्याशिवाय अचानक घेतलेली रजा स्वीकारली जाणार नाही.”

एवढ्यावरच तो मॅनेजर थांबला नाही, तर काही मिनिटांनी त्याने दुसरा एक मेसेज टाकला, “जर शक्य असेल, तर आज काही तास तरी काम करायचा प्रयत्न कर, कारण सध्या काम खूप महत्त्वाचं आहे.” आता तुम्हीच सांगा, जर माणूस आजारी आहे, तर तो काम कसा करणार?

Asked for sick leave. Got told it’s not an emergency… then asked to work anyway.
byu/Extension-Main9868 inIndianWorkplace

कर्मचाऱ्याचा सवाल: सिक लीव्ह म्हणजे ‘वर्क फ्रॉम होम’ का? (Employee’s question: Is sick leave now work from home?)

मॅनेजरच्या या चीड आणणाऱ्या मेसेजबाबत पोस्ट कर्मचाऱ्याने थेट रेडिटवर (Reddit) शेअर केली. ही पोस्ट करताना त्याने लिहिलं, “भावांनो, मला एक सांगा, तब्येत खराब असणं ही इमर्जन्सी नाही का? जर मी रजा मागतोय याचा अर्थ मला काम करणं जमणार नाहीये. मग हे ‘काही तास काम कर’ असं म्हणणं काय आहे? आजकाल सिक लीव्हचा अर्थ ‘आज थोडं कमी काम करा’ असा झालाय की काय?”

त्याने पुढे एक कडू सत्य मांडलं की, “ऑफिसमध्ये प्रत्येक डेडलाईन आणि प्रत्येक प्रोजेक्ट हा ‘क्रिटिकल’च असतो. मग कर्मचाऱ्यांनी त्यांच्या हक्काची रजा घ्यायची कधी? आणि रजा घेतली की आपण कामाबद्दल सिरीयस नाही, असा शिक्का मारला जातो.”

नेटीझन्स भडकले, दिल्या भन्नाट प्रतिक्रिया! (Netizens react with anger and humor)

ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच नोकरदार वर्गाने आपल्या मनातील सगळा राग कमेंट्समध्ये ओकून काढला. नेटीझन्सनी मॅनेजरची चांगलीच शाळा घेतली:

  • आरोग्य महत्त्वाचं बॉस!: एका युझरने लिहिलं, “पहिले तब्येत सुधारा, मग ऑफिस बघा. आज जर आराम केला नाही, तर आजार वाढेल आणि पुढे जास्त सुट्ट्या घ्याव्या लागतील. हे त्या मॅनेजरला समजत कसं नाही?”
  • थेट सल्ला: दुसऱ्या एकाने थेट सल्ला दिला, “भावा, गपचूप नवीन कंपनी शोधायला सुरुवात कर. इथे तुझी कदर नाही.”
  • आता विचारायचं नाही, सांगायचं!: अनेक युझर्सनी सांगितलं की, “आजारी असल्यावर रजा ‘मागायची’ नसते, तर ‘सांगायची’ असते. ग्रुपवर मेसेज टाकायचा की ‘तब्येत बरी नाहीये, मी आज सुट्टीवर आहे’ आणि फोन थेट स्विच ऑफ करायचा. तुम्ही परवानगी मागता म्हणूनच ते नकार देतात.”
  • मजेशीर कमेंट: एकाने हिंदीत मज्जा घेत लिहिलं, एक दिवस मी पण मॅनेजर बनणार आणि असाच रुबाब मारणार!

कॉर्पोरेट टॉक्सिसिटीवर पुन्हा एकदा चर्चा (Discussion on corporate toxicity again)

या एका पोस्टमुळे सध्या कॉर्पोरेट कल्चरमधील ‘टॉक्सिसिटी’ आणि ‘वर्क-लाइफ बॅलन्स’वर पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे. कर्मचाऱ्यांना मशीन समजून त्यांच्या आरोग्यापेक्षा कामाला जास्त महत्त्व देण्याची ही प्रवृत्ती कधी थांबणार? असा प्रश्न आता प्रत्येक नोकरदार विचारत आहे.