जगात एक असा कुत्रा देखील आहे जो करोडपती आहे आणि कुत्रा २३० कोटी रुपयांची आपली मियामी हवेली विकत आहे. हा वाडा एकेकाळी प्रसिद्ध हॉलिवूड गायिका मॅडोनाचा होता. गंथर-VI असे या करोडपती कुत्र्याचे नाव असून तो जर्मन शेफर्ड जातीचा आहे. अमेरिकेतील मियामी, फ्लोरिडा येथे कुत्रा ज्या हवेलीची विक्री करत आहे, जे नऊ बेडरूमचे वॉटरफ्रंट घर देखील आहे. गंथर-VIचे पूर्वज गंथर- III (Gunter 3) हे त्यांची दिवंगत मालकीण , काउंटेस कार्लोटा लिबेन्स्टीन यांच्याकडून ४३० कोटी रुपयांची मालमत्ता प्राप्त करणारे पहिले होते. गंथर- III ला १९९२ मध्ये मालमत्तेचा वारसा मिळाला, जेव्हा त्याची मालकीण काउंटेस कार्लोटा मरण पावली. ( हे ही वाचा: दुर्मिळ आजाराने त्रस्त असलेल्या मुलीला ‘या’ कंपनीने केली १६ कोटींची मदत ) गंथर-III नंतर ही मालमत्ता आता गंथर-VI च्या नावावर झाली आहे. त्यांची पूर्ण काळजी घेण्यासाठी एक टीम आहे. गंथर-VI हे आपले आयुष्य एका रईस माणसासारखे जगतात. त्यांची सेवा करण्यासाठी अनेक नोकरही ठेवले आहेत. बिस्केन खाडीच्या नजरेतून दिसणार्या मियामी व्हिलाच्या लिव्हिंग रूममध्ये फायरप्लेसच्या वर गंथर-IV चे सोनेरी पेंटिंग देखील आहे. हा व्हिला मियामीच्या पॉश भागात आहे. या व्हिलामधून अप्रतिम दृश्य दिसते. येथून संपूर्ण शहराचे दृश्यही दिसते. यात नऊ बेडरूम आणि आठ बाथरूम आहेत. आणि बाहेर एक अप्रतिम स्विमिंग पूल देखील आहे. ( हे ही वाचा: Video: “मॅन ऑफ द मॅच आम्हा पटेलांमध्येच राहील असे दिसते!” – हर्षल पटेल ) इटालियन प्रेसने १९९५ मध्ये नोंदवले की काउंटेस कार्लोटा लिबेन्स्टाईन नावाची महिला कधीही नव्हती. तर हवेलीच्या जुन्या मालकाने असे काही नसल्याचे सांगितले. कार्लोटा लिबेन्स्टीन नावाच्या महिलेने तिची संपत्ती तिच्या कुत्र्याला दिली होती. बरं, ते काहीही असो, सध्या हा कुत्रा मियामीमध्ये खूप आरामात आपले आयुष्य घालवत आहे.