scorecardresearch

Premium

“हीच खरी माणुसकी!” दिव्यांग व्यक्तीसाठी तरुणाने जुगाड करून बनवली लाकडी सायकल, Viral Video पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक

तरुणाची माणुसकीचे लोक कौतूक करत आहे. आपल्या कौशल्याचा दुसऱ्यांच्या भल्यासाठी वापर कसा करावा याचे उत्तम उदाहरण आहे व्हिडीओ.

This is true humanity Netizens praised the wooden bicycle made by a young man by juggling for a disabled person after seeing the viral video
दिव्यांग व्यक्तीसाठी जुगाड करून बनवली लाकडी सायकल (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात ज्यामध्ये जुगाडचे व्हिडीओ खूप असतात. अनेकदा लोक स्वत:च्या सोयीसाठी काही ना काही जुगाड करताना दिसतात पण सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक तरुण दुसऱ्याला मदत करण्यासाठी जुगाड करताना दिसत आहे. एक दिव्यांग व्यक्तीची मदत करण्यासाठी एका तरुणाने जुगाड करून लाकडी सायकल तयार केल्याचे दिसते आहे. तरुणाची माणुसकीचे लोक कौतूक करत आहे. आपल्या कौशल्याचा दुसऱ्यांच्या भल्यासाठी वापर कसा करावा याचे उत्तम उदाहरण आहे व्हिडीओ.

जुगाड करून बनवली लाकडी सायकल

man kidnapped for marriage hyderabad
फोटो पाहून प्रेम, लग्नासाठी व्यावसायिक महिलेनं केलं मुलाचं अपहरण; गुन्हा दाखल
OBC
ओबीसींचा खरा शत्रू कोण?
youth faked his own kidnapping
पिंपरी : तरुणाने रचला स्वत:च्याच अपहरणाचा बनाव, पोलिसांनी तासाभरात लावला छडा
lalit kala kendra ram leela pune marathi news, pune ram leela controversy marathi news
पुण्यामधल्या ललित कला केंद्रात नेमकं काय झालं? ‘नाटका’नंतरच्या ‘नाटकां’चं काय करायचं?

इंस्टाग्रामवर akshay_r_15 नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये तरूण सांगतो की, एका दिव्यांग  व्यक्तीला रस्त्यावर तो नेहमी पाहतो. तो हाताच्या मदतीने जमिनीवर बसून पुढे सरकताना दिसतो आहे. तरुणाला त्या व्यक्तीची दया येते आणि त्याची मदत करण्यासाठी लाकडी सायकल तयार करताना दिसतो आहे. एक लाकडी फळी बसेल असा लोखंडी सांगाडा तयार करून त्याला चाक बसवताना दिसत आहे. ही लाकडी सायकल तो त्या दिव्यांग व्यक्तीला जाऊन देतो. त्या व्यक्तीला त्या फळीवर बसवतो. तो व्यक्ती या तरुणाचे आभार व्यक्त करून त्याला आशिर्वाद देतो आहेत.

हेही वाचक – पाणीपुरी विक्रेत्याची कमाई ऐकून बसेल धक्का! कॉर्पोरेट नोकरदारांपेक्षा त्यांची रोजची कमाई आहे जास्त, Viral Video एकदा बघाच!

हेही वाचता –“इतका प्रतिभावान कलाकार रस्त्यावर का?” रस्त्यावर राहणाऱ्या व्यक्तीने फुटपाथवर रेखाटलं सुंदर चित्र, Viral Video पाहून नेटकरी झाले थक्क

लोकांनी माणुसकीचे केले कौतूक

तरुणाच्या मनाचा मोठेपणा पाहून लोक भारावून गेले आहे. तरुणाच्या प्रयत्नाचे नेटकऱ्यांनी कौतूक केले आहे. व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. एकाने लिहिले, दादा हा व्हिडीओ पाहून तुला लाइक्स भरपूर मिळतील पण जो आशिर्वाद काका देत आहे तो लाख मोलाचा आहे. असेच काम करत रहा, “फुल ना फुलाची पाकळी” दुसरा म्हणाला, “खुप भारी रे दादा व्हिडिओ आवडला म्हणून स्टेट्सला पण ठेवला” तिसरा म्हणाला, “छान कार्य अशीच मदत करत रहा, तुम्हाला काही कमी नाही पडणार” चौथा म्हणाला, “देव तुला नक्कीच याच परत चांगलं फळ देणार आहे मित्रा!!”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: This is true humanity netizens praised the wooden bicycle made by a young man by juggling for a disabled person after seeing the viral video snk

First published on: 11-12-2023 at 17:03 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×