scorecardresearch

एवढ्या लहान वयातही ही मुलगी करतेय इतका ड्रामा; व्हिडीओ पाहून नेटकरीही चक्रावले

एक लहान मुलगी आपल्या वयाच्या तुलनेत इतका ड्रामा करतेय की तुम्ही हा व्हिडीओ पाहून नक्कीच चकित व्हाल.

viral
या मुलीच्या नौटंकीच्या पुढे मोठमोठे नौटंकीबाज हरतील. (Photo : Twitter/@TheFigen)

आपण आपल्या घरातील लहान मुलांचे नखरे नेहमीच झेलत असतो. ही लहान मुलं कोणत्याही गोष्टीवरून रागावतात आणि जमिनीवर लोळून रडू लागतात. आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळवण्यासाठी ही मुलं जीवाचा आटापिटा करतात. आज आपण असाच एक व्हिडीओ पाहणार आहोत ज्यात एक लहान मुलगी आपल्या वयाच्या तुलनेत इतका ड्रामा करतेय की तुम्ही हा व्हिडीओ पाहून नक्कीच चकित व्हाल. या मुलीच्या नौटंकीच्या पुढे मोठमोठे नौटंकीबाज हरतील. सध्या या लहान मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचं हसणं थांबणार नाही. हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच म्हणाल की या एवढ्याश्या मुलीला इतका ड्रामा करायला शिकवलं कोणी? तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता, ही मुलगी खेळता खेळता अप्रतिम नाटक करत आहे. सोशल मीडियावर नेटकरी या व्हिडीओचा भरपूर आनंद घेत आहेत.

व्हिडीओमध्ये दिसत आहे, ही मुलगी आपल्या भावासोबत काही खेळ खेळत आहे. यादरम्यान ती आपल्या भावाकडून खेळणी हिसकावण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु जेव्हा तिचा भाऊ तिला खेळणी देत नाही तेव्हा ती मुद्दाम जमिनीवर पडून रडू लागते. याशिवाय एका सीनमध्ये मुलगी खेळण्याच्या गाडीला उचलताना दिसतेय. त्याचवेळी तिचा भाऊसुद्धा तीच गाडी उचलतो. यानंतर ही नौटंकीबाज मुलगी सोफ्यावर आदळते. ती अशाप्रकारे सोफ्यावर पडते जसं की तिच्या भावानेच तिला धक्का दिला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: This little girl is doing so much drama netizens went crazy watching the video pvp

ताज्या बातम्या