रांगेत उभं राहणं हा सर्वात कंटाळवाणा भाग असतो, मग ती तिकीटाची रांग असो किंवा बस स्टॉपवरची रांग असो. मात्र लोकांच्या याच कंटाळ्यामधून एका व्यक्तीने कमाईचा मार्ग शोधून काढलाय. ही व्यक्ती श्रीमंत लोकांसाठी रांगेत उभी राहून दिवसाला हजारो रुपये कमवते.

फ्रेडी बिकीट नावाची ही व्यक्ती रांगेत उभं राहण्यासाठी तासाचे पैसे घेते. फ्रेडी हा प्रोफेशनल क्युऐरर म्हणजेच रांगेत उभा राहणार आहे. लंडनसारख्या गजबजाट असणाऱ्या शहरामध्ये राहत असल्याने रांग लावणे ही गोष्ट माझ्या अंगवळणी पडलेली आहे असं फ्रेडीने द सनला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलंय. रांग लावण्याचा आपल्याला चांगलाच अनुभव असल्याचं ३१ वर्षीय फ्रेडी सांगतो. दिवसातील आठ तास तो काम करतो. म्हणजेच दिवसातील आठ तास तो लंडन शहरामध्ये कुठे ना कुठे, कोणातरीसाठी रांगेत उभा असतो.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Maldhok birds
अग्रलेख: पूतनामावशीचे पर्यावरणप्रेम!
Rural Health Services pregnant woman from Nandurbar lost her life due to lack of timely medical care
ग्रामीण आरोग्य सेवा : ठसठसती जखम!

लंडनमध्ये उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये म्हणजेच पाश्चिमात्य देशांमधील समर व्हेकेशनच्या काळामध्ये फ्रेडी फार व्यस्त असतो. या कालावध्ये लंडनमध्ये अनेक मोठे कार्यक्रम आणि प्रदर्शन भरवली जात असल्याने फ्रेडीला बरंच काम मिळतं. आपल्या आवडत्या कार्यक्रमांसाठी रांगेत उभं राहणं फ्रेडीला विशेष आवडतं. नुकताच तो लंडमधील व्ही अ‍ॅण्ड व्ही ख्रिश्चन डायरो या प्रदर्शनासाठीच्या तिकिटांच्या रांगेत काही लोकप्रिय लोकांसाठी नंबर लावून उभा होता. तिकीटं घेतल्यानंतर संबंधित व्यक्ती तिथे येईपर्यंत फ्रेडी उभाही राहतो. मात्र त्यासाठी तो वेगळे पैसे घेतो.

फ्रेडी टास्करॅबीट या वेबसाईटच्या माध्यमातून आपली सेवा पुरवतो. रांगेत उभं राहण्याच्या कामाबरोबरच तो पाळीव प्राण्यांची देखभाल करणे, बगीचाची देखभाल करणे अशी कामंही करतो. फ्रेडी या कामासाठी तासाभराची फी म्हणून २० पौंडांहून अधिक पैसे घेत नाही. या कामासाठी फार कष्ट लागत नाही आणि मेहनतही फारशी नसते त्यामुळे मी याहून अधिक दर घेत नाही असं फ्रेडी सांगतो. फ्रेडीचा दर तासाला २० पौंड म्हणजेच दोन हजार २९ रुपये इतका आहे. दिवसाला माझी १६० पौंडांपर्यंतही (तब्बल १६ हजार रुपयांपर्यंत) कमाई होते, असंही फ्रेडी सांगतो.