scorecardresearch

‘या’ व्यक्तीने एकाच मंडपात नऊ महिलांशी केले लग्न; कारण ऐकून चक्रावून जाल!

या व्यक्तीने एकाच वेळी एकाच मंडपात ९ महिलांशी लग्न केले आणि यावर त्याने दिलेल्या कारणामुळे तो आणखीनच चर्चेत आला आहे.

man married nine women
मॉडेलने एका वेळी नऊ महिलांशी लग्न केलं (फोटो: Pixabay)

ब्राझीलमध्ये एका व्यक्तीने एक-दोन नव्हे तर नऊ महिलांशी लग्न केले आहे, तेही एकाच मंडपात. साओ पाउलो शहरातील कॅथोलिक चर्चमध्ये झालेल्या या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ब्राझिलियन मॉडेल आर्थर ओ उर्सो (Arthur O Urso), ज्याने नऊ महिलांशी विवाह केला, तो म्हणतो की त्याने ‘मुक्त प्रेम’ (Free Love) साजरा करण्यासाठी हे केले.

मॉडेल आर्थर आधीच विवाहित आहे

‘डेली स्टार’च्या रिपोर्टनुसार, मॉडेल आर्थर ओ उर्सोचे आधीच लग्न झाले आहे आणि त्याने आपल्या हनीमूनचे हॉट फोटो शेअर करून चर्चेला अजून एक नवीन विषय दिला होता. आता नऊ महिलांशी एकत्र लग्न करून तो पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. एका महिलेशी लग्न करण्याच्या परंपरेच्या विरोधात असल्याचं त्याचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच एकाच मंडपात नऊ महिलांशी लग्न करून एकपत्नीत्वाच्या (Monogamy) विरोधात आवाज उठवला आहे.

( हे ही वाचा: Viral Video: कर्णधार रोहित शर्माने सिराजला का मारलं?; डगआऊटमधील एक क्षण कैमेऱ्यात कैद )

ब्राझिलियन मॉडेल आपल्या पहिल्या पत्नीसह लुआना काझाकीसोबत हनिमूनसाठी फ्रान्सला गेली होती. तिथून त्याने अशी काही फोटो शेअर केली होते, ज्यामुळे वाद निर्माण झाला होता. दोघेही अनेक फ्रेंच शहरात नग्न होऊन फिरले होते. यावरून त्यांना टीकेला सामोरे जावे लागले असले तरी त्यांनी काही फरक पडला नाही.

(फोटो: सोशल मीडिया)

करोना महामारी दरम्यान दिलेल्या टिप्स

या जोडप्याने कोरोना महामारीच्या काळात लोकांना सेक्सशी संबंधित टिप्स देऊन देखील स्वतःला चर्चेत आणले. दोघांनी सांगितले होते की, आम्ही अशा लोकांना सेक्ससाठी प्रेरित केले, ज्यांचे आयुष्य करोनामुळे घराच्या भिंतीपर्यंत मर्यादित राहिली आहे. आम्ही त्यांना वेगवेगळ्या पोझिशनपासून प्रत्येक लहान गोष्टी सांगितल्या, जेणेकरून ते चांगले शारीरिक संबंध अनुभवू शकतील.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-11-2021 at 14:30 IST