उत्तर प्रदेशातील नोएडा येथे दोन चालत्या गाड्यांवर चढून फिल्मी स्टाइलमध्ये स्टंट करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. याशिवाय दोन्ही कार आणि एक मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली. या धोकादायक स्टंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.

व्हिडीओमधील स्टंट पाहिल्यानंतर तुम्हाला अजय देवगण याचा गोलमाल चित्रपटातील स्टंट आठवेल, ज्यामध्ये तो दोन चालत्या गाड्यांवर उभा असल्याचे दिसतो. असाच काहीसा स्टंट या पठ्ठ्याने करण्याचा प्रयत्न केला, मात्र याचे परिणाम फारच वाईट झाले आहेत. अटक करण्यात आलेल्या तरुणाचा एक साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण दोन गाड्यांवर फिल्मी स्टाइलमध्ये स्टंट करताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओची दखल घेत सेक्टर ११३ पोलिस स्टेशनने या व्यक्तीवर कारवाई केली.

Viral Video : स्कुटी आणि बाईकची झाली टक्कर, नंतर तरुणाने मुलीसोबत जे केले ते पाहून तुम्हालाही येईल राग

अवघ्या पाच वर्षांच्या मुलीनं बाळाला दिला होता जन्म; घटना वाचून थक्क व्हाल

धोकादायक स्टंट करणाऱ्या राजीवला रविवारी अटक करण्यात आली असून स्टंटमध्ये वापरण्यात आलेल्या दोन फॉर्च्युनर कार आणि एक मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. या घटनेत सहभागी असलेला तरुण फरार असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये पाहायला मिळाला. गाझियाबादमधील हे स्टंटप्रेमी प्रसिद्ध होण्यासाठी केवळ आपलाच जीव धोक्यात घालत नाहीत तर रस्त्यावरून चालणाऱ्या इतर लोकांचा जीवही धोक्यात घालत आहेत. गाझियाबादमध्ये असे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, ज्यावर गाझियाबाद ट्रॅफिक पोलिस सातत्याने कारवाईही करत आहेत.