राजकीय नेते, पक्ष आणि संघटनांच्या भूमिकेमुळे राज्यात हिंदू-मुस्लिम असा वाद नेहमीच पाहायला मिळतो. मात्र या निमित्ताने आजही क्रांतिवीर या हिंदी चित्रपटातील नाना पाटेकर यांचा डायलॉग आठवतो. “ये मुसलमान का खून, ये हिंदू का खून, बता इस में कोनसा हिंदू का और कोनसा मुसलमान का? बनानेवाले ने इसमे फरक नही किया तो तू कोन होता है इसमे फरक करने वाला” आणि याचेच जिवंत उदाहरण देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एका मुस्लिम कुटुंबियांनी हिंदु कर्मचाऱ्याचे अंत्यसंस्काराची विधी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ बिहारमधला आहे. या व्हिडीओमधल्या एका मुस्लिम कुटुंबाने हिंदू व्यक्तीचे अंत्यसंस्कार करून जातीय सलोख्याचा आदर्श ठेवला आहे. मोहम्मद रिजवान खान रामदेव साह यांचे पार्थिव खांद्यावर उचलतानाात व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. मोहम्मद साह हे रिझवान यांच्या पाटणा इथल्या होजियरी आउटलेटमध्ये काम करत असे. त्यांनी २५ वर्षे त्यांच्या दुकानात काम केलं आणि त्यांना रिझवान यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यासारखे वागवले. साह यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. रिझवान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हिंदू रितीरिवाजांनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. अंत्यविधीच्या वेळी अनेक मुस्लिम शेजारीही उपस्थित होते.

आणखी वाचा : Gay Couple Wedding: लग्नबंधनात अडकले ते दोघे ‘गे’, सोशल मीडियावर PHOTO VIRAL

स्थानिकांचे म्हणणे आहे की साह दोन दशकांपूर्वी रिझवानच्या दुकानात आले होते आणि त्यांच्या साधेपणाने ते प्रभावित झाले होते. “ते माझ्या वडिलांसारखे होते. जेव्हा ते माझ्या दुकानात नोकरीच्या शोधात आले तेव्हा त्यांचे वय ५० च्या आसपास असावे. मी त्यांना सांगितले होते की तुम्ही वजनदार काम करू शकणार नाहीस. साह यांनी मला सांगितले की, ते हिशेबात चांगले आहेत आणि पुस्तकांचं व्यवस्थापन करू शकतात,” असे रिजवान यांन सांगितले. “वय वाढल्यामुळे आणि साह आपली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम नसल्यामुळे मी त्यांना विश्रांती घेण्यासाठी सांगितलं. मी त्यांना सांगितले की, त्यांचा पगार त्यांना मिळेल आणि त्यांना कशाचीही काळजी करण्याची गरज नाही,” , असं देखील रिजवान यांनी सांगितलं.

आणखी वाचा : म्हशीने आपल्या हटके स्टाईलने कासवाची केली मदत, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : वीज तुमच्या गाडीवर कोसळली तर? काय होईल हे जाणून घेण्यासाठी हा VIRAL VIDEO पाहा

“टेलिव्हिजनवर जे दाखवले जात आहे ते योग्य चित्र दाखवत नाही. जेव्हा एखादे मूल जखमी होते तेव्हा आम्ही त्याचा धर्म विचारत नाही, आम्ही प्राथमिक उपचार देतो. त्याचप्रमाणे हिंदू आमच्या कार्यक्रमांना उपस्थित राहतात आणि आम्ही त्यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहतो.”, असं देखील रिजवान म्हणाले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This muslim family performed last rites of their hindu employee prp
First published on: 07-07-2022 at 17:07 IST