अनोखी लव्ह स्टोरी, एकाच मुलीशी चारवेळा केला विवाह

‘तो’ मुस्लिम, ‘ती’ हिंदू

फैजने आधी हिंदू पद्धतीने राम मंदिरात लग्न केले त्यानंतर कोर्ट मेरॅजही केले ( छाया सौजन्य : mymagmoments)

भारतातल्या खेड्यापाड्यात आतंरजातीय विवाह केल्यावर त्या जोडप्यांना जीवे मारून टाकले जाते, अशा कितीतरी घटना समोर येतात, त्यातून हिंदू मुस्लिम असेल तर बोलण्याची सोय नाही. पण काही धाडसी जोडपे असेही आहेत जे ही सारी बंधने झुगारून नव्याने आयुष्याची सुरूवात करतात. अंकिता आणि फैज त्यातले एक. फैज मुस्लिम तर अंकिता हिंदू त्यामुळे साहाजिकच ज्या अडचणींना सामोरे जावे लागते त्याच अडचणी या दोघांच्याही वाट्याला आल्यात. समाजाचे सोडा घरचेही या लग्नाच्या विरोधात. त्यातून अंकिताच्या वडिलांचा या लग्नाला ठाम विरोध.

अंकिता हिंदू त्यातून शुद्ध शाकाहारी भोजन त्यांच्या घरी शिजते, पण लग्न झाल्यावर फैज अंकितांचे धर्मांतर करेन आणि तिलाही मग मांसमच्छी खायला लावेल अशी अंकिताच्या घरच्यांची भिती होतीच. त्यातून या धर्माप्रमाणे पुरूषाला एकापेक्षा अधिक लग्न करण्याचीही मूभा असते त्यामुळे फैजने असे केले तर आपल्या मुलीचे आयुष्य उद्धवस्त होईल अशी भिती त्यांना सतावात होती आणि ती साहजिकच होती. त्यामुळे अंकिताच्या वडिलांनी या लग्नाला विरोध केला. पण लग्न करण्याच्या निर्णयावर ते दोघेही ठाम राहिले. दोन वर्षांपूर्वीच त्यांचा विवाह पार पडला. फैजने आधी हिंदू पद्धतीने राम मंदिरात लग्न केले त्यानंतर कोर्ट मेरॅजही केले, त्यामुळे या कायद्याप्रमाणे त्याला एकापेक्षा जास्त लग्न करण्याचा अधिकार राहणार नाही, त्यामुळे तीही समस्या त्याने सोडवली.नंतर मुस्लिम पद्धतीने निकाह केला आणि पुन्हा एकदा मित्रमैत्रिणींच्या साक्षीने त्यांनी हिंदू पद्धतीने विवाह केला. प्रेमात अडचणी तर असतात पण या दोघांनी त्यावर मार्ग शोधला आणि आपली लव्ह स्टोरी सफल करून दाखवली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: This muslim man married the same woman four times

ताज्या बातम्या