PMPML bus driver teach a lesson to the reckless driver : पुणे आणि पुणेकरांचे एकापेक्षा एक किस्से तुम्ही ऐकले असतील. मोजक्या शब्दात अपमान करण्याच्या पुणेकरांच्या शैलीमुळे पुणेकरांच्या नादाला सहसा कोणी लागत नाही. आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि उपाहास्त्मक टीकेसाठी ओळखले जाणाऱ्या पुणेकरांसह वाद घालण्याआधी लोक शंभर वेळा विचार करतात. सोशल मीडियावर पुणेकरांचे अनेक व्हिडीओ आजकाल समोर येतात. पुणेरी शैली ही प्रत्येक व्यक्तीमध्ये पाहायला मिळते मग तो रस्त्यावरील सामान्य व्यक्ती असो की, पीएमपीपएलचा बसचालक असो. अशाच एका पीएमपीएल(PMPML) बसचालकाचा व्हिडिओ सध्या चर्चा होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक बसचालक बीआरटी मार्गात शिरणाऱ्या कारचालकाला चांगला धडा शिकवला आहे. बेशिस्त वाहनचालकाला धडा शिकवण्याचा प्रयत्न या पीएमपीएल बसचालकाने केला आहे.

पुण्यात बेशिस्त वाहनचालकांची काही कमी नाही. पुण्यात वाहनचालक सर्रासपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. दुचाकी चालक कधीही हेल्मेट परिधान करत नाही, कोणी सिग्नलचे नियम पाळत नाही, कोणी जीव धोक्यात टाकून रस्ता ओलांडते , कोणी फुटपाथवरून दुचाकी चालवते. वाहतूक कोंडीतून सुटका मिळावी याकरिता पुण्यात अनेक ठिकाणी पीएमपीएल बससाठी स्वतंत्र बीआरटी मार्ग तयार करण्यात आला आहे जेथून फक्त पीएमपीएमल बसला जाण्यास परवानगी आहे. असे असतानाही अनेक दुचाकीस्वार आणि कार चालक थेट बीआरटी मार्गाचा वापर करताना दिसतात. अशाच प्रकारे वाघोतील येथील बीआरटी मार्गातून प्रवास करणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांना एका पीएमपीएमल बस चालकाने चांगलाच धडा शिकवला आहे.

Puneri pati viral for parking in his spot funny puneri pati goes viral
PHOTO: पुणेकरांचा नाद नाय! गेट समोर गाडी पार्क करणाऱ्यांना आकर्षक बक्षिसे; शेवटचं बक्षिस वाचून पोट धरुन हसाल
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
constable commits suicide marathi news
पुणे: महिला पोलीस शिपायाची इंद्रायणी नदीत उडी; तरुणाने वाचवण्याचा प्रयत्न केला पण…
Really last digit of your mobile number tell about your nature and personality
तुमच्या मोबाईलचा शेवटचा अंक खरंच सांगतो तुमचा स्वभाव? सोशल मीडियावर VIDEO चर्चेत
Pakistan International Airlines Flight
पाकिस्तानच्या विमानाने तुम्ही कधी प्रवास केलाय का? प्रवाशाने शेअर केलेला Video पाहून तुमचीही झोप उडणार!
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
Ganpati aagaman rush in aagman sohala shocking video
गणपती आगमनाची भीषण बाजू; VIDEO पाहून थरकाप उडेल, पाहा आणि तुम्हीच सांगा हे कितपत योग्य?

हेही वाचा –अमेरिकन युट्युबरने खरेदी केला ८४ लाखांचा रोबो डॉग, भुंकताना ओकतोय आग, Video Viral

व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, कशाप्रकारे एक बेशिस्त कारचालक आणि रिक्षाचालक बीआरटी मार्गातून प्रवास करत आहे. एवढचं नव्हे तर हे बेशिस्त वाहनचालक थेट विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये शिरला. पण समोरून येणार्‍या पीएमपीएल बसचालकाने त्याचा मार्ग अडवला. एवढंच नाही तर कारचालकाला तशीच कार मागे घ्यावी लागली तर रिक्षाचालक रिक्षा वळवून दुसर्‍या लेनमध्ये जातो.

हेही वाचा – Video : ‘ओ ओ जाने जाना..’, सलमान खानच्या गाण्यावर थिरकले आजोबा, भन्नाट डान्स पाहून पोट धरून हसाल

बेशिस्त वाहनचालकाना योग्य मार्ग दाखवणाऱ्या पीएमपीएल बसचालकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ जवळपापास २७ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओ एक्स(पूर्वीचे ट्विट्र) @PuneriSpeaks नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “PMPML चालक कडून सरळ रस्ता दाखवण्याचा प्रयत्न”

हेही वाचा – ‘शिखंडी!’ पुण्यात उभारले पहिले तृतीयपंथी ढोल-ताशा पथक, तुम्ही ऐकले का त्यांचे वादन, Viral Video एकदा पाहाच

व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “कोणी सांगितले बीआरटी लेनमधून जायला,” असा प्रश्न एकाने विचारला आहे. दुसरा म्हणाला, “या लोकांकडून दंड वसुल केला तरी सरकारचा महसूल जमा होईल”

आणखी एकाने लिहिले की,”किती तरी वेळा तक्रार करूनही बीआरटीमधील घुसखोरी थांबत नाही खरोखरच मोडकळलीस आलेली यंत्रणा उखडून टाकण्याची वेळ आली आहे.”