पुणे, पुणेकर आणि पुणेरी पाट्या यांची चर्चा जगभर होत असते. कारण पुणेकरांची शैलीच अशी आहे मग चर्चा तर होणारच! “किमान शब्दात कमाल अपमान” करण्याची शैली फक्त पुणेकरांकडेच आहे असे म्हणतात. पुणेकरांना कोणालाही सल्ला द्यायचा असो किंवा सुचना त्यासाठी ही नेहमी पुणेरी शैलीच वापरली जाते. याच पुणेरी शैलीमुळे निर्माण झालेल्या पुणेरी पाट्या देखील आता जगभर चर्चेत आहेत. अनेकांना प्रश्न पडतो की, पुणेरी पाट्यांची इतकी चर्चा का होते? कारण मोजक्या शब्दात योग्य ती गोष्ट सांगण्याचे हे कौशल्य फक्त पुणेकरांकडे आणि ते फक्त पुणेरी पाट्यांमध्येच तुम्हाला पाहायला मिळते. घरात शिरणाऱ्या चोरट्यांना कुत्र्याची भिती घालायची असो किंवा गेटसमोर बेशिस्तपणे गाडी पार्क करणारे लोक असो…नियम मोडणाऱ्यांना शिस्त लावण्याचे काम या पुणेरी पाट्या योग्यपद्धतीने करतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका पुणेरी पाटीची जोरदार चर्चा होत आहे.

बेशिस्त वाहनचालकानां पुणेरी शैलीत टोला

नो पार्किंगमध्ये बेशिस्तपणे वाहन लावणाऱ्यांची संख्या पुण्यात दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकदा येथे वाहन लावण्यास सक्त मनाई आहे असा सुचना फलक लावलेला असतानाही लोक तिथेच गाडी लावून जातात. अशा बेशिस्त लोकांसाठी लावलेली एक पुणेरी पाटी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हायरल पाटीवर नो पार्किंगचे चिन्ह दिसत आहे आणि त्याखाली लिहिले आहे की, “रस्त्यावर वाहने लावू नयेत. हे वाचूनही बिनडोकपणे गाडी लावली तर त्या वाहनांच्या पुढील अवस्थेस आम्ही जबाबदार नसू – हुकामावरून”

हेही वाचा – ‘शिखंडी!’ पुण्यात उभारले पहिले तृतीयपंथी ढोल-ताशा पथक, तुम्ही ऐकले का त्यांचे वादन, Viral Video एकदा पाहाच

उगाच पुणेरी पाट्या जगभर प्रसिद्ध नाहीत

व्हायरल पाटी इंस्टाग्रामवर ek_puneri नावाच्या पेजवर शेअर केली आहे. व्हायरल पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”उगाच पुण्याच्या पाट्या जगभर प्रसिद्ध नाहीत”

हेही वाचा – पुणेकरांचा नाद करायचा नाही! ‘पीएमपीएल’ बस चालकाने बेशिस्त कार चालकाला घडवली अद्दल, Video होतोय Viral

मोजक्या शब्दात अपमान करण्याच्या पुणेकरांच्या शैलीमुळे पुणेकरांच्या नादाला सहसा कोणी लागत नाही. आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि उपाहास्त्मक टीकेसाठी ओळखले जाणाऱ्या पुणेकरांसह वाद घालण्याआधी लोक शंभर वेळा विचार करतात. बेशिस्त वाहनचालकांना शिस्त कशी लावायची हे पुणेकरांना चांगले माहित आहे. या बेशिस्त वाहनचालकांना पुणेरी शैलीत टोला मारणारी ही पुणेरी पाटी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.