Shakuntala Railways Track : भारतात दररोज हजारो ट्रेन प्रवास करतात. या ट्रेनमधून लाखो लोक प्रवास करतात. तुम्ही अशा अनेक रेल्वे ट्रॅक्सबद्दल ऐकले असेल, जे अत्यंत दुर्गम ठिकाणी बांधलेले आहेत. पण आज आपण अशा एका रेल्वे ट्रॅकबद्दल जाणून घेणार आहोत, जो आजही ब्रिटिशांच्या ताब्यात आहे. इतकंच नाही तर, या ट्रॅकवर ट्रेन चालवण्यासाठी भारतीय रेल्वे ब्रिटनच्या एका खासगी कंपनीला वर्षाला ठराविक कर देते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा रेल्वे ट्रॅक अमरावती जिल्ह्यात आहे. या मार्गावर धावणाऱ्या शकुंतला एक्स्प्रेसमुळे याला ‘शकुंतला रेल मार्ग’ असेही म्हणतात. १९०३ मध्ये क्लिक निक्सन या ब्रिटिश कंपनीच्या वतीने हा ट्रॅक बनवण्याचे काम सुरू करण्यात आले. रेल्वे ट्रॅक बनवण्याचे काम १९१६ मध्ये पूर्ण झाले. ही कंपनी आज सेंट्रल प्रोव्हिन्सेस रेल्वे कंपनी म्हणून ओळखली जाते. त्याकाळी अमरावतीचा परिसर कापसासाठी देशभरात प्रसिद्ध होता. मुंबई बंदरात कापूस नेण्यासाठी ब्रिटिशांनी हा ट्रॅक बांधला होता. त्याकाळी फक्त खाजगी कंपन्याच रेल्वेचे जाळे पसरवण्याचे काम करत असत.

अवघ्या पाच वर्षांच्या मुलीनं बाळाला दिला होता जन्म; घटना वाचून थक्क व्हाल

आजही हा ट्रॅक ब्रिटनच्या या कंपनीच्या ताब्यात आहे. त्याच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारीही त्यांच्यावर आहे. भारतीय रेल्वे ब्रिटनच्या या खासगी कंपनीला वर्षाला १ कोटी २० लाख रुपये देते. मात्र, दरवर्षी कर देऊनही हा ट्रॅक अतिशय जीर्ण झाला आहे. गेल्या ६० वर्षांपासून त्याची डागडुजीही झाली नसल्याचे रेल्वे सूत्रांचे म्हणणे आहे. या ट्रॅकच्या वाईट अवस्थेमुळे त्यावर चालणाऱ्या जेडीएम मालिकेतील डिझेल लोको इंजिनचा कमाल वेग २० किमी प्रतितास ठेवण्यात आला आहे.

या रेल्वे मार्गावरील सिग्नल आजही ब्रिटीशकालीन आहेत. येथून धावणाऱ्या शकुंतला एक्स्प्रेस ट्रेनमध्ये दररोज हजाराहून अधिक लोक प्रवास करतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This railway track in india is still owned by the british tax has to be paid every year pvp
First published on: 16-05-2022 at 12:12 IST