Pornhub वरुन ‘तो’ देतोय गणिताचे धडे; तुम्ही त्याला वेड्यात काढाल पण त्याच्या कमाईचा आकडा पाहून थक्क व्हाल

जास्तीत जास्त लोकांनी माझे व्हिडीओ पॉर्नहब साईटवर पहावेत असं तो सांगतो. हे असं सांगण्यामागे एक विशेष कारण आहे.

changshu pornhub
त्याचं या साईटवरील अकाऊंट व्हेरिफाइड आहे. (फोटो सोशल मीडियावरुन साभार)

पॉर्नहब हा शब्द वाचून इंटरनेट वापरणाऱ्या कोणाच्याही डोक्यात सर्वात आधी येणारी गोष्ट म्हणजे पॉर्न फिल्मस आणि अश्लील कंटेट. मात्र याच प्लॅटफॉर्मचा वापर करुन विद्यार्थ्यांना गणिताचे धडे दिले जातात असं सांगितलं तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल नाही का? मात्र हे खरं आहे. तैवानमधील एक शिक्षक खरोखरच या अशा आऊट ऑफ द बॉक्स पद्धतीने विद्यार्थ्यांना गणित शिकवत आहे. आता हे असं काही वाचल्यावर तुम्ही नक्कीच या शिक्षकाला वेड्यात काढाल किंवा हा काय वेडेपणा आहे?, इथे कोण येणार गणितं सोडवायला?, सगळं सोडून हाच प्लॅटफॉर्म मिळाला का? हे आणि असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आले असतील. मात्र त्याला मिळाणारे पैशांचा आकडा पाहून तुम्ही थक्क व्हाल यात शंका नाही.

लाखोंच्या संख्येने व्ह्यूज…
या हटके माध्यमातून गणित प्रबोधन करणाऱ्या शिक्षकाचं नाव आहे चँगसू! चँगसू हा पॉर्नहबवर गणिताचे धडे देतो. आता तुम्हाला वाटेल की गणित शिकायला कोणी पॉर्नहबवर कशाला जाईल. तर जाणून आश्चर्य वाटेल पण चँगसूच्या व्हिडीओंना लाखोंच्या संख्येने व्ह्यूज आहेत. म्हणजेच पॉर्नहबचा प्लॅटफॉर्म असला तरी अनेकजण इथे चँगसूचे व्हिडीओ बघतात हे ह्यूजच्या क्रमांकावरुन स्पष्ट होतं आहे.

“… म्हणून मी पॉर्नहबवर व्हिडीओ अपलोड करायला सुरुवात केली”
चँगसूचे या साईटवर चँगसूमॅथ६६६ या नावाने अकाऊंट आहे. त्याचे अकाऊंट हे व्हेरिफाइड आहे. त्याने एक्सव्हिडीओ साईटवरही गणिताचे क्लास घेण्याचे प्रयत्न केले. मात्र तिथे त्याला प्रतिसाद मिळाला नाही कारण तिथे अडल्ट कंटेंट वगळता इतर गोष्टींसंदर्भातील व्हिडीओ अपलोड करु दिले जात नाहीत. ही अडचण पॉर्नहब संदर्भात नाहीय. याबद्दल मेल मॅगझीनशी बोलताना चँगसू म्हणतो, “पॉर्न वेबसाईटवर फार कमी लोकं गणित शिकायला येतात. या ठिकाणी लोक पॉर्न व्हिडीओ बघायला येत असल्याने इथे लोक माझे व्हिडीओ पाहतील असं मला वाटलं म्हणून मी अकाऊंट सुरु करुन व्हिडीओ अपलोड करायला सुरुवात केली.”

लोकांना माझ्या व्हिडीओंमध्ये, गणितांमध्ये रस नसेल; मात्र…”
“प्ले हार्ड, स्टडी हार्ड”, असा फिचर मेसेज चँगसूच्या अकाऊंटवर आहे. तो त्याच्या व्हिडीओमध्ये कायम ग्रे रंगाचं हूडी पद्धतीचं शर्ट आणि चष्मा घालून दिसतो. तो ग्रीन बोर्डवर कठीण कठीण गणितं सोडवतो. तो मॅण्डरीन भाषेमध्ये गणितं कशी सोडवायची हे सांगतो. “लोकांना माझ्या व्हिडीओंमध्ये, गणितांमध्ये रस नसेल. मात्र त्यांना या व्हिडीओंमुळे हे माहितीय की या पॉर्न वेबसाईटवर एक शिक्षक आहे जो कॅलक्युलस शिकवतो,” असं चँगसू म्हणतो. अर्ध्याहून अधिक जण तर हा काय प्रकार आहे यासाठी माझे व्हिडीओ पाहतात असं चँगसूला वाटतं.

“मला फक्त जगाला हे दाखवायचं आहे की…”
जास्तीत जास्त लोकांनी माझे व्हिडीओ पॉर्नहब साईटवर पहावेत असं चँगसू सांगतो. कारण त्याला यामधून अडीच लाख डॉलर्सची कमाई होणं अपेक्षित आहे. एवढे पैसे आले की तो हे व्हिडीओ निर्माण करण्यासाठी त्याला मदत करणाऱ्यांना त्यांचे पगार देऊ शकतो आणि आणखीन व्हिडीओ निर्माण करु शकतो. “मला पॉर्न वेबसाईटवर गणित शिकवायचं नाहीय. मला फक्त जगाला हे दाखवायचं आहे की तैवानमध्ये असा एक शिक्षक आहे जो कॅलक्युलस योग्य पद्धतीने शिकवू शकतो,” असं चँगसू म्हणतो. अनेकजण अगदी शेवटपर्यंत चँगसूचे हे गणिताचे व्हिडीओ पाहतात असं तो सांगतो.

वर्षभराची कमाई किती?
चँगसू हा युट्यूब आणि इन्स्टाग्रामवरही असल्याने पॉर्नहबशिवाय इतर माध्यमांवरुनही आपण धडे देतोय असं तो सांगतो. दरवर्षी तो या व्हिडीओमधून जवळजवळ दोन कोटी रुपयांची कमाई करतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: This teacher uses pornhub to give maths lessons earns around rs 2 crore per year scsg