या चिमुकलीचा व्हिडीओ इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ; Viral Video पाहून तुम्हीही म्हणाल, “ही तर बॉर्न डान्सर”

हा व्हिडीओ लोकांना खूप आनंदी करत आहे आणि कमेंट सेक्शनमध्ये गोंडस मुलीवर प्रेमाचा वर्षाव होत आहे.

viral video
डान्सची व्हिडीओ क्लिप @TheFigen ने ट्विटरवर शेअर केली आहे.

लहान मुले सर्वांनाच आवडतात. पण काही मुलं अशी असतात की ते सहज इतरांचे लक्ष स्वतःकडे खेचून घेतात. मुले मोठ्यांचे निरीक्षण करून अनेक शिकतात आणि अनेकदा त्यांच्या कृतींचे अनुकरण करताना आढळतात. असाच एक मनमोहक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे, ज्यामध्ये लहान मुलगी मोठ्यांच्या डान्स स्टेप्सची नक्कल करताना दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला एका डान्स इन्स्ट्रक्टरने एका समूहाला डान्स मूव्ह शिकवताना दिसत आहे.

दरम्यान, ही लहान मुलगी प्रशिक्षकासमोर उभी राहते आणि अत्यंत आत्मविश्वासाने प्रत्येक पाऊल अगदी अचूकपणे कॉपी करते. ती त्यांच्या स्टेप्स आणि डान्स त्यांच्याच प्रमाणे अगदी सहजतेने करते. भविष्यात ही मुलगी एक उत्कृष्ट नृत्यांगना म्हणून मोठी झाली तर आश्चर्य वाटणार नाही. डान्सची व्हिडीओ क्लिप @TheFigen ने ट्विटरवर शेअर केली आहे. या व्हिडीओसोबत कॅप्शनमध्ये लिहलंय, “काही मुलं जन्मताच लयबद्ध असतात.”

Viral Video : स्कुटी आणि बाईकची झाली टक्कर, नंतर तरुणाने मुलीसोबत जे केले ते पाहून तुम्हालाही येईल राग

हा व्हिडीओ लोकांना खूप आनंदी करत आहे आणि कमेंट सेक्शनमध्ये गोंडस मुलीवर प्रेमाचा वर्षाव होत आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. काहींनी तिच्या प्रतिभेचे आणि निरागस डान्स मूव्ह्सचे कौतुक केले. एका वापरकर्त्याने लिहिले की, “मुलांचे निरीक्षण खूप मजबूत असते. आपण त्यांच्यासमोर जे काही करतो ते आपली नक्कल करतात.” दुसर्‍याने कमेंट केली, “तिने त्यांना खाली आणले!” तिसर्‍याने लिहिले, “अरे देवा, ती खूप मोहक आहे.” चौथा म्हणाला, “असे दिसते की प्रशिक्षकच या मुलीच्या पावलावर पाऊल टाकत आहे, अन्यथा नाही.. तरीही ती परिपूर्ण आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: This video of little girl is trending on the internet after watching the viral video you will say she is a born dancer pvp

Next Story
हात नसलेल्या व्यक्तीचे वाहन चालवायचे कौशल्य पाहून आनंद महिंद्रा म्हणाले, “…ही आमच्यासाठी सन्मानाची बाब”
फोटो गॅलरी