scorecardresearch

दुधाने मुलीचे पाय धुतले आणि तेच दुध प्यायले, बाप-लेकीच्या नात्याचा हा गोंडस VIRAL VIDEO पाहाच

लेकीच्या लग्नात गहिवरल्या बापाचा असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.

दुधाने मुलीचे पाय धुतले आणि तेच दुध प्यायले, बाप-लेकीच्या नात्याचा हा गोंडस VIRAL VIDEO पाहाच
(Photo: Twitter/ Sanjay Kumar, Dy. Collector)

बाप-लेकीचं नातं काही स्पेशल असंत. कुठलीही मुलगी जर डोळे झाकून एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवू शकते तर तो फक्त तिच्या वडिलांवर. लेक जर घराचे सौख्य असेल तर त्या सौख्याचे पावित्र्य तिचा बाबा असतो. बोट धरून चालायला शिकवणारा बाबा असतो, लेकीच्या हट्टासाठी घोडा होणाराही बाबा असतो. कामावरून येताना रोज न चुकता खाऊ आणणाराही बाबाच असतो. लेकीला नाजूक कळीसारखा सांभाळतो आणि प्रसंगी बाबाचा धाकही असतोच. म्हणूनच म्हणतात ना, बाप-लेकीच्या नात्याला कसलीच तोड नाही. याचाच प्रत्यय देणाऱ्या एका बाप-लेकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा भावूक व्हाल, हे मात्र नक्की.

आई-वडिलांच्या आयुष्यात आनंद देणारा क्षण असतो तो म्हणजे आपल्या लेकराचं लग्नं. मुलगा असो वा मुलगी…त्यातल्या त्यात मुलीचं लग्न असेल तर तो आनंद काही औरच असतो. विशेषतः पुरूषप्रधान संस्कृती असलेल्या आपल्या समाजात मुलीच्या लग्नात वडिलांचं गहिवरणं, भावुकपणे रडणं हा क्षण येतोच. लेकीच्या लग्नात गहिवरल्या बापाचा असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये बापाने लेकीचे पाय दुधाने धुतले आणि ते प्यायले सुद्धा.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : नेटकऱ्यांनी शोधली रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’ चित्रपटातील मोठी चूक, तुम्ही पाहिली का?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लेकीच्या लग्नातल्या विधीपैकी एक विधी सुरू असल्याचं दिसून येतंय. यामध्ये लेक एका खुर्चीवर बसलेली दिसत आहे. तिच्या पायाखाली एक ताट देखील ठेवण्यात आलंय. बाप आपल्या लेकीचे पाय प्रेमाने आधी पाण्याने धुताना दिसत आहेत. मग तिचे पाय दुधाने धुतात. लेकीचे पाय धुताना ताटात जे दुध जमा झालं ते एका वाटीत जमा करून ते दुध स्वतः पितात.

आणखी वाचा : लेकीला पोटाशी घेऊन फूड डिलिव्हरी करतेय ही महिला, VIRAL VIDEO पाहून जनता झाली भावूक

वडिलांना प्रेमाने आपले धुताना पाहून लेकीचे देखील अश्रू अनावर होतात. जे आपले वडील पाय धुतलेलं दुध पिऊ लागतात, त्यावेळी लेक त्यांना रोखण्याचा प्रयत्न करते. पण बापाचं प्रेम इतकं होतं की त्यांनी तिचं सुद्धा ऐकलं नाही. त्यांनी तिला थांबवलं आणि दुध पिऊन टाकलं. त्यानंतर एका स्वच्छ कपड्याने तिचे पाय पुसतात आणि एका पांढऱ्या कपड्यावर तिच्या पाऊलखुणा घेतात.

आणखी वाचा : जेव्हा ग्रामीण महिला पहिल्यांदाच एस्केलेटरवर चढल्या, पाहा गोंडस VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : अजबच! ५० तरुणांच्या टोळीने मॅकडोनाल्डमध्ये घुसून खाद्यपदार्थ आणि सॉफ्ट ड्रिंक्स लुटले, पाहा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ पाहून सारेच जण भावूक झाले आहेत. हा व्हिडीओ आयएएस अधिकारी संजय कुमार यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलाय. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल देखील झाला. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागला की आतापर्यंत या व्हिडीओला १ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.