scorecardresearch

आत्महत्येचा विचार ते पद्मश्री पुरस्काराच्या मानकरी; माता बी मनजम्मा यांचा थक्क करणारा प्रवास!

यावेळी पद्म पुरस्कार प्राप्त करणार्‍यांपैकी एक कर्नाटकच्या तृतीयपंथी कलाकार माता बी मनजम्मा जोगती देखील आहेत.

Manjamma-Jogatti
पद्मश्री पुरस्काराच्या मानकरी माता बी मनजम्मा (फोटो: Indian Express)

राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार स्वीकारणे हा कोणत्याही भारतीयासाठी अभिनानाचा आणि आयुष्यभर लक्षात राहणारा क्षणच असतो, मत ते भारतीय अगदी त्यांच्या क्षेत्रातील दिग्गज असले तरी ते भारावून जातात. यावेळी पद्म पुरस्कार प्राप्त करणार्‍यांपैकी एक कर्नाटकच्या तृतीयपंथी कलाकार माता बी मनजम्मा जोगती देखील आहे. त्यांनी पद्मश्री प्राप्त करताना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना त्यांच्या स्वत: च्या शैलीत दृष्ट काढली.यावेळी पंतप्रधानांपासून ते सभागृहातील मान्यवरांनी टाळ्या वाजवून त्यांच्या कृतीचं कौतुक केलं.

कसा होता त्यांचा प्रवास?

माता बी मनजम्मा यांनी साडी नेसून रस्त्यावर भीक मागून त्यांचा प्रवास एकट्याने सुरू केला. त्यांचे लैंगिक शोषणही झाले आणि त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला होता पण त्यांना नृत्य शिकवणारे वडील आणि मुलगा भेटला, ज्यांमुळे त्यांनी आयुष्याला एक नवीन सुरुवात केली.

( हे ही वाचा: Video: …अन् पद्म पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांनी पंतप्रधानांसमोरच राष्ट्रपतींची दृष्ट काढली )

त्यांची ओळख कल्लव जोगाथीशी यांच्याशी झाली जिथे मनजम्मा यांनी जोगठी नृत्य (जोगप्पाचे लोक सादरीकरण) हा नृत्य प्रकार शिकला आणि राज्यभरात सादरीकरण करण्यास सुरुवात केली. कालव्वाच्या मृत्यूनंतर, त्यांनी मंडळाचा ताबा घेतला आणि हे नृत्य अधिक लोकप्रिय झाले. मंजम्मा कर्नाटक जानपद अकादमीची पहिली ट्रान्सजेंडर अध्यक्ष बनल्या, ही कर्नाटकातील कला सादर करणारी सरकारी संस्था आहे.

सर्व संकटे आणि अडचणींमध्ये त्यांनी अनेक कलांमध्ये प्रभुत्व मिळवले. जोगठी यांनी प्रत्येक पावलावर स्वत:ला बळ दिले आणि आर्थिक दुर्बल लोकांनाही मदत केली. कलाक्षेत्रात त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करून त्यात प्रभुत्व मिळवले.

( हे ही वाचा: Fact-check: मौलाना चक्क अन्नावर थुंकत आहेत? जाणून घ्या, व्हायरल व्हिडीओ खरा की खोटा? )

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना, अक्काई पद्मशाली, एक प्रसिद्ध भारतीय ट्रान्सजेंडर कार्यकर्ती म्हणाल्या, “जोपर्यंत मंजम्माच्या पुरस्काराचा प्रश्न आहे, त्या संपूर्ण समुदायाचे प्रतिनिधित्व करत असल्याने मला तितकाच आनंद आहे. मी आणि समुदायाच्या वतीने भारत सरकारचे आभार मानतो ज्याने मंजम्माचा सन्मान करून तृतीयपंथी समुदायाच्या योगदानाचा विचार केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-11-2021 at 13:13 IST

संबंधित बातम्या