scorecardresearch

बापरे! घराच्या सिलिंगमध्ये लपले होते तीन मोठे साप, शेपटी दिसली अन् सर्वांची झाली पळापळ, Video व्हायरल

रात्रीच्या वेळी सापाची शेपटी दिसल्यावर घरातील माणसांनी आरडाओरड सुरु केली, त्यानंतर घडलं भयंकर, पाहा व्हिडीओ.

बापरे! घराच्या सिलिंगमध्ये लपले होते तीन मोठे साप, शेपटी दिसली अन् सर्वांची झाली पळापळ, Video व्हायरल
घराच्या सिलिंगमध्ये आढळले तीन मोठे साप. (Image-Twitter)

Giant Snake Viral Video : सर्वांचा थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घराच्या अंगणात, रस्त्यावर साप दिसला की अनेकांच्या अंगावर शहारा येतो. छोटा साप असला तरी अनेकांचा थरकाप उडतो. कारण सर्पदंशाने माणसांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशातच आता एका नवीन व्हिडीओनं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मलेशियात राहणाऱ्या एका कुटुंबियांच्या घरात छतावर तीन मोठे साप आढळले. एका सापाची शेपटी छताला लटकलेली दिसतात घरच्यांनी तातडीनं स्नेक हॅंडलिंग टीमला संपर्क साधला. रात्रीच्या वेळी साप घरात घुसल्यानं घरच्यांनी आरडाओरडा केला. या तीन सापांची थरारक दृष्य कॅमेरात कैद झाली असून व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

सापांचा हा धक्कादायक व्हिडीओ @bornAkang नावाच्या ट्वीटर युजरने शेअर केला आहे. सर्पमित्र लोखंडी रॉडचा वापर करुन सिलिंगमध्ये असलेल्या सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना या व्हिडीओत दिसत आहे. सापाची शेपटी सिलिंगला अडकल्याचं सुरुवातील या व्हिडीओत दिसत आहे. पण या सापाला बाहेर काढत असताना सिलिंमध्ये असलेले आणखी दोन मोठे साप घराच्या भिंतीवर पडतात. हे दृष्य पाहून घरातील माणसं आरडाओरडा करत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. साप एकमेकांना विळखा घालण्याचा प्रयत्न करत असल्याचंही या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

नक्की वाचा – Video : मालदिव्हच्या पाण्यात केलं ‘अंडर वॉटर किस’, त्या कपलने थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला, कारण…

हा व्हिडीओ शेअर केल्यापासून आतापर्यंत १ कोटीहून अधिक व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. तर १ लाखाहून अधिक नेटकऱ्यांनी व्हिडीओला लाईक केलं आहे. तसेच ४० हजारांहून अधिक लोकांनी रिट्विट्ही केलं आहे. अंगावर काटा आणणारा हा सापांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, मी त्या रात्री घर सोडलं असतं आणि परत कधीच आलो नसतो.” दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं, “हे पाहून मला वाईट स्वप्न पडतील.” तर अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं, “हे दृष्य मला आयुष्यभर आठवत राहतील.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-02-2023 at 12:46 IST
ताज्या बातम्या