scorecardresearch

Video: टीव्ही चोरण्यासाठी आलेल्या तीन चोरांची फजिती; शेवटी झालं असं की तुम्हाला हसू आवरणार नाही

सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो.

Theft_Video_Viral
Video: टीव्ही चोरण्यासाठी आलेल्या तीन चोरांची फजिती; शेवटी झालं असं की तुम्हाला हसू आवरणार नाही (Photo- Viral Video Grab)

सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. यात काही सीसीटीव्ही फुटेज सुद्धा असतात. काही सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसतो. तर काही सीसीटीव्ही फुटेज मजेशीर असतात. असात एक मजेशील सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तीन चोर गाडीने एलईडी टीव्ही चोरण्यासाठी आले होते. मात्र त्यांची झालेली फजिती पाहता व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येकाला हसू आवरता येत नाही.

व्हायरल व्हिडीओत सर्वात आधी एक चोर कारमधून बाहेर येतो आणि आत लावलेला एलईडी स्क्रीन काढण्याचा प्रयत्न करतो. हा चोर खूप प्रयत्न करतो. मात्र त्याला यश येत नाही. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर दुसरा चोर गाडीतून बाहेर येतो. मात्र तेथे पोहोचण्यापूर्वीच तो जाऊन भिंतीला धडकतो. असं दोन तीन वेळा होतं. एखाद्या कॉमेडी सिरीअलसारखं दृश्य असल्यासारखं वाटेल. कसाबसा दुसरा चोर पहिल्या साथीदाराकडे पोहोचतो आणि एलईडी काढण्यास मदत करतो. जोराजोरात खेचून एलईडी काढतो. मात्र होतं असं की जमिनीवर पाय घसरून टीव्ही खाली आदळतो आणि स्क्रिन तुटते. दोन्ही चोर टीव्ही तसाच जागेवर ठेवून पळ काढतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

नेटकरी या व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. त्याचबरोबर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षावर सुरु आहे. हा व्हिडीओ नेमका कुठचा आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Three theif tv theft funny video viral on social media rmt