Viral Video : गडकिल्ले हे महाराष्ट्राच्या संस्कतीचा अविभाज्य भाग आहे. दर दिवशी पर्यटक महाराष्ट्रातील विविध गडकिल्यांना भेट देतात. गडकिल्यांवरील फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात पण अनेकदा याच गडकिल्ल्यांवर चुकीचा प्रकार घडताना दिसून येतो. काही लोक येथील परिसर घाण करतात तर काही लोक जीव धोक्यात घालून स्टंट करण्याचा प्रयत्न करतात. सोशल मीडियावर अनेक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ अंगावर काटा आणणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तीन तरुण जीव धोक्यात घालून गडकिल्ला चढण्याचा प्रयत्न करत आहे. (Three young boys risk their lives at visapur fort lonavala shocking video goes viral)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तीन मित्र दिसेल. हे तीन मित्र गड चढताना दिसत आहे. विशेष म्हणजे जीव धोक्यात घालून गड चढण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांची एक छोटीशी चुक त्यांचा जीव गमावू शकते. कोणतीही सुरक्षा किंवा सुरक्षेचे साधन नसताना ते गड किल्ले चढण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईन. या व्हिडीओवर लिहिलेय, “तुमची निसर्गातील एक छोटीशी चूक तुमचे आयुष्य उध्वस्त करू शकते.” सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ लोणावळाजवळील विसापूर किल्ला येथील आहे.

tiger's Viral Video
‘शिकार करो या शिकार बनो’, बैलाची शिकार करण्यासाठी वाघाचा क्रूर हल्ला; VIDEO पाहून अंगावर येईल काटा
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Toddlers strugglet to help family to sale Diwali diya heart touching video
VIDEO: खरंच परिस्थितीसमोर झुकावं लागतं! दिवाळीचे दिवे विकताना चिमुकल्याची इच्छाशक्ती पाहून म्हणाल “लेक असावा तर असा”
Akola man plucked the dead peacock feathers from the Road and took them Home the video w
VIDEO: “देवा सुंदर जगामंदी का रं माणूस घडविलास” मृत्यूनंतरही यातना संपेना..लोकांनी मेलेल्या मोराबरोबर काय केलं पाहा
Viral video of girls fighting in a class and a boy angrily hits the bench
“एकमेकींच्या जीवावरच उठतील”, भरवर्गात दोन मुलींचं भांडण सुरू असताना मुलाचा राग अनावर, पुढच्याच क्षणी त्याने जे काही केलं ते भयंकर
Dog jumps to save drowning owner
पाण्यात पडलेल्या मालकाला वाचवण्यासाठी श्वानाने मारली उडी; VIDEO पाहून व्हाल अवाक्
Farmer desi jugaad video farmer jugaad to protect maize field from pig goes viral watch video
शेतकऱ्यांचा नाद करायचाच नाय; डुक्करांपासून संरक्षण करण्यासाठी ढासू जुगाड; Video एकदा पाहाच
TRAGIC! Hyderabad Youth Falls Off 3rd Floor Of Hotel Building While Trying To Shoo Away Dog
मृत्यू आपल्याला कसा जाळ्यात ओढतो पाहा; तरुणाच्या मृत्यूचा थरारक VIDEO बघून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

हेही वाचा : Mahindra Thar Roxx Clocks: ६० मिनिटांत १.७६ लाख बुकिंग! तुफान ट्रेडिंगवर असणाऱ्या महिंद्रा थार ROXX ची फीचर्स अन् किंमत जाणून घ्या…

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : पुणेकरांचा विषयच हार्ड! गेट समोर गाडी पार्क करणाऱ्यांना दिली थेट धमकी; ‘ही’ पुणेरी पाटी वाचून पोट धरुन हसाल

__rahul_ly_143 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “अशामुळे ज्या ट्रेकर्सची क्षमता आहे त्यांना सुद्धा बंदी लागते” तर एका युजरने लिहिलेय, ” सर्व ट्रेकिंग करणाऱ्या भावांना माझी विनंती आहे की आपल्या घरी आपले कुटुंब हे आई वडील बहिण आहे यांचा विचार करून पुढचे पाऊल उचलत जा.” आणखी एका युजरने लिहिलेय, “किल्ले विसापूर ची ही तटबंदी आहे.” एक युजर लिहितो, “सांभाळून रे मित्रांनो जेवढा आत्मविश्वास आहे तेवढेच पाऊल टाका…” तर एक युजर लिहितो, “निसर्गात खेळा पण निसर्गाशी खेळू नका”