हिमाचल एका बसचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या बस चालकाच्या ड्रायव्हींग स्किल्सच कौतुक होत आहे. हिमाचलच्या या चालकांशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही. अरुंद रस्ते, एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खड्डा असतानाही ते प्रवाशांना अशा सुरक्षितपणे इच्छितस्थळी कसे पोहोचवतात? असा प्रश्न हा व्हिडीओ बघून सगळ्यांना पडला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला हिमाचलचे ड्रायव्हर कसे अवजड वाहन चालवतात हे कळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. धबधब्याजवळून हिमाचल रोडवेजची बस जात असल्याचे दिसून येते. त्याच्या एका बाजूला डोंगर आणि एका बाजूला दरी आहे. मात्र बसचा चालक मात्र अगदी सहजतेने बस चालवत आहे. दुरून पाहिल्यावर आपल्याला भीती वाटते की एवढ्या छोट्या वाटेवर बस कशी चालेल. हा व्हिडीओ चंबा ते किल्लारपर्यंतचा आहे असं सांगितलं जात आहे.

(हे ही वाचा: Optical Illusion: या फोटोतील झोपलेली मांजर तुम्ही शोधू शकता का?)

(हे ही वाचा: Viral Photo: या फोटोत लपलंय हरीण, तुम्ही शोधू शकता का?)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

काही लोकांनी तर हिमाचल रोडवेजच्या या ड्रायव्हर्सना खरे हिरो म्हंटल आहे. त्याचवेळी हा व्हिडीओ पाहून काही लोक घाबरले. एका यूजरने लिहिले की, “भारतात टॅलेंटची कमतरता नाही. कुशल चालकच हा अवघड रस्ता पार करू शकतो.” चालकांच्या धाडसाला लोकांनी सलाम केला. त्याचवेळी एका यूजरने प्रवाशांच्या धाडसाचही कौतुक केलं आहे. त्यांनी लिहिले की ड्रायव्हरला तर हॅट्स ऑफ, तसेच प्रवाशांनाही मोठा हॅट्स ऑफ.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thrilling video of a bus driver driving through the mountains of himachal goes viral ttg
First published on: 11-05-2022 at 10:57 IST