Throwback pic: बॉलिवूडमधील तारे-तारका अधूनमधून सोशल मीडियावर त्यांचे लहानपणीचे फोटो पोस्ट करत असतात. त्यांच्या चाहत्यांसाठी ही पर्वणी असते. बॉलिवूडच्या अशाच एका लोकप्रिय अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीने तिच्या लहानपणीचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. शाळेत एका कार्यक्रमात नृत्य सादर केल्यानंतर आपल्या मैत्रिणींसह हा फोटो काढला होता, अशी आठवणही तिने सांगितली आहे. “आम्ही चौघी वयाच्या १७ व्या वर्षात असताना”, असे कॅप्शन या पोस्टसह लिहिण्यात आले आहे.

नोरा फतेहीच्या या फोटोची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. कारण तिच्यात आता बराच बदल झाला असल्याचे तिचे चाहते कमेंट करून सांगत होते. शाळेत असताना एका कार्यक्रमासाठी आम्ही आठवडाभर तालीम केली होती, माझ्या मैत्रिणींनी उत्तम सादरीकरण केले होते. त्यांना नृत्याचे धडे देताना मला आनंद वाटला, अशी आठवणही नोराने या पोस्टमध्ये सांगितली आहे. नोराने पोस्टमध्ये पुढे म्हटले की, आम्ही एकत्रितपणे बेली डान्स सादर केला होता.

हे वाचा >> Video: मलायका अरोराचे सावत्र वडील अनंतात विलीन; अरबाज खानने दुसऱ्या पत्नीसह मलायकाच्या कुटुंबियांची घेतली भेट

नोरासह या फोटोत असलेल्या नताशा नावाच्या मैत्रिणीने पोस्टवर कमेंट करून आश्चर्य व्यक्त केले आहे. “या आपणच आहोत, यावर आता विश्वास बसत नाही. आपण किती लहान होतो, पण आपल्यात उत्साहाची कमतरता नव्हती. या फोटोमुळे मीही काही क्षणासाठी भूतकाळात गेले” अशी कमेंट नताशाने केली आहे.

आता प्लास्टिक सर्जरी केल्याची चाहत्यांना शंका

सेलिब्रिटींकडून जेव्हा जेव्हा असे लहानपणीचे फोटो टाकले जातात, तेव्हा तेव्हा त्यांनी चित्रपटसृष्टीत येण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केल्याचा आरोप करण्यात येतो. नोरालाही अशा कमेंटचा आता सामना करावा लागत आहे. नोरा शाळेत असताना जशी दिसत होती, त्यापेक्षा आता वेगळी दिसते. त्यामुळे तिनेही चेहऱ्यात कृत्रिमरित्या बदल केले, असे काही चाहते म्हणत आहे. एका युजरने कमेंटमध्ये म्हटले, “डावीकडून पहिली असणारी नोरा आहे. तिने कोणतीही सर्जरी केलेली नाही. तरीही ती सुंदर दिसते. पण मला प्रश्न पडला आहे की, एखादी व्यक्ती १७ आणि १८ व्या वर्षी वेगवेगळी कशी दिसू शकते.”

हे ही वाचा >> सुंदरी! गुलाबी साडीत खुललं रिंकू राजगुरुचं सौंदर्य; आर्चीच्या मराठमोळ्या लूकवर कमेंट्सचा पाऊस

अनेकांनी नोराच्या जुन्या आणि आताच्या फोटोवरून वाद घातला असला तरी तिच्या काही चाहत्यांनी मात्र नोराचे समर्थन केले आहे. चुकीच्या कमेंट करणाऱ्यांना तिच्या चाहत्यांनी रिप्लाय करून तुम्ही १६-१७ वर्षांचे असताना कसे दिसत होता, असा प्रश्न विचारला आहे. त्यामुळे अशा बालिश कमेंट करू नका, असे उत्तर तिचे चाहते देत आहे. नोराने साधी एक आठवण शेअर केल्यानंतर विषय कुठच्या कुठे गेला, हे अनेक कमेंटवरून दिसते.