Tiger attack on Man Viral Video : सोशल मीडियावर जंगली प्राण्यांचे वेगवेगळे फोटो व्हिडीओ व्हायरल होत असतात. वाघाची डरकाळी ऐकून चांगल्या लोकांना घाम फुटतो. मात्र अशी कल्पना करा की तुम्ही कुठेतरी पायी जात आहात आणि अचानक तुम्हाला तुमच्या समोर वाघ दिसला, तुम्ही काय कराल? अशी परिस्थिती कोणावर ओढवली तर खेळ खल्लास हे नक्की. सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधीत तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात. तर काही व्हिडीओ हे मजेदार असतात. काही वन्य प्राणी असे असतात की ते जंगलात असो किंवा दुसरीकडे कुठे, त्यांची भीती कायम असते. यात सिंह आणि वाघांचा क्रमांक पहिला येतो. ते जगातील सर्वात भयानक प्राण्यांपैकी एक मानले जातात, जे मानवांवर देखील हल्ला करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. त्यांना भूक लागली तर ते कोणालाही आपला बळी बनवू शकतात.

सध्या असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर सगळ्यांचाच थरकाप उडालाय. दोन व्यक्ती हत्तीवर बसून जंगल सफारीसाठी गेले असताना अचानक वाघ येतो आणि त्यांच्यावर हल्ला करतो, याचा लाइव्ह व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

leopard Viral Video
‘आईचं प्रेम लाखात एक…’ विहिरीत पडलेल्या पिल्लाला वाचवण्यासाठी बिबट्या मादीने मागितली मदत; VIDEO पाहून व्हाल भावूक
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
a friend saved life of his friend by using presence of mind
VIDEO : मित्राच्या प्रसंगावधानाने वाचला तरुणाचा जीव, नेटकरी म्हणाले, “शंभर नातेवाईक असण्यापेक्षा एक असा मित्र हवा”
Terrifying video shows skydiving instructor jumping off cliff before falling to death shocking video
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?
burst crackers on the bike
“भावा, आई-वडिलांचा विचार करायचा…“, बाईकवर बसून फोडले फटाके अन् पुढे जे घडलं; VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका हत्तीवर जंगसफारीसाठी गेलेल्या दोन व्यक्तींना अक्षरश: समोर मृत्यू दिसला. जंगल सफारीसाठी गेले असताना अचानक समोर वाघ येतो आणि तो आक्रमक होत जवळ जवळ येऊ लागतो. यावेळी हे हत्तीला इशारा देत मागे मागे पळण्याचा प्रयत्न करतात. मात्र क्षणात वाघ मोठी झेप घेत त्यातील एका व्यक्तीवर झडप घालतो आणि अक्षरश: त्याचा हात फाडतो. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा व्यक्ती स्वत:चा बचाव करण्यासाठी एका काठीणे वाघाला मारण्याचा प्रयत्न करतो मात्र वाघ त्याच्या हाताचा लचका तोडतो. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.

पाहा व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/DAq9kUnyDFJ/?igsh=aHB6eG5sa2Y4aXMz

हेही वाचा >> VIDEO:“देवा पोटासाठी असा संघर्ष कुणालाच देऊ नकोस रे” विशाल समुद्रात दुसऱ्या बोटीवर उडी मारताना विक्रेत्याचा पाय घसरला अन्…

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @jungle.safari.india नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण थक्क झाले आहेत, या व्यक्तीचं पुढे काय झालं याची काहीच कल्पना नाहीय. नेटकरीही व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.