Tiger vs Crocodile Viral Video: जंगल म्हणजे नुसतं सौंदर्य नाही, तर ते निसर्गाचं कठोर वास्तव आहे. इथे प्रत्येक क्षणाला धोका दडलेला असतो आणि शिकारी स्वतः कधी शिकार बनू शकतो, हे सांगणारा एक थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहताना क्षणभर श्वास रोखला जातो आणि पुढे काय होणार, याची धाकधूक मनात निर्माण होते.

या व्हिडीओमध्ये एक वाघ शांतपणे नदीकाठी येतो. उष्णतेमुळे तहानलेला वाघ पाणी पिण्यासाठी पाण्याकडे झुकतो. आजूबाजूला सगळं शांत… कोणतीही हालचाल नाही… पण पाण्याच्या आत लपलेला असतो एक अत्यंत धोकादायक शिकारी. काही सेकंदांतच नदीतून अचानक मगर बाहेर झेपावते आणि वाघावर जोरदार हल्ला करण्याचा प्रयत्न करते.

क्षणात परिस्थिती पालटते. पाणी उडतं, हालचाल वाढते आणि मृत्यू अगदी जवळ येतो. मात्र, वाघाची चपळाई आणि प्रसंगावधान त्याच्या कामी येतं. विजेसारखी झेप घेत वाघ मागे सरकतो आणि स्वतःचा जीव वाचवतो. काही सेकंदांचा हा थरार इतका तीव्रतेने जाणवतो की, व्हिडीओ पाहणाऱ्यांच्या अंगावर अक्षरशः शहारे येतात.

हा संपूर्ण प्रसंग जंगल सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद झाला. जंगलात प्रत्यक्ष घडणारा असा प्रसंग क्वचितच पाहायला मिळतो. शिकारी आणि शिकार यांच्यातील हा संघर्ष निसर्गाच्या नियमांची आठवण करून देतो. जंगलात कुणीही कायम सुरक्षित नसतो, हेच या घटनेतून अधोरेखित होतं.

या व्हिडीओबाबत वन विभागानंही प्रतिक्रिया दिली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, नदी परिसरात मगर आणि वाघ यांचा वावर आधीपासून नोंदवला गेला आहे. त्यामुळे अशी घटना हा पूर्णपणे नैसर्गिक वर्तनाचा भाग आहे. मात्र, अशा प्रसंगातून जंगल किती धोकादायक असू शकतं, हे स्पष्ट होतं.

या घटनेनंतर वन विभागानं पर्यटकांना पुन्हा एकदा इशारा दिला आहे. जंगल सफारीदरम्यान नियमांचं काटेकोर पालन करावं, वाहनातून बाहेर पडू नये, प्राण्यांपासून सुरक्षित अंतर ठेवावं आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासात कोणतीही छेडछाड करू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

हा व्हायरल व्हिडीओ निसर्गाची ताकद, जंगलाचे कठोर नियम आणि जिवंत राहण्यासाठीची लढाई दाखवून देतो. वाघाची चपळ बुद्धी आणि वेगामुळे त्याचा जीव वाचला असला तरी हा प्रसंग पाहणाऱ्यांच्या मनात भीती आणि थरार निर्माण करतो.

ही घटना नेमकी कुठे घडली?

हा अंगावर शहारे आणणारा प्रसंग उत्तराखंड राज्यातील जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पातील ढिकाला विभागात रामगंगा नदीच्या काठी घडला.

येथे पाहा व्हिडीओ