scorecardresearch

सुंदरबनमधील वाघाचा बोटीतून उडी मारतानाच हा Viral Video एकदा बघाच!

Viral Video: हा व्हिडीओ ९३ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

tiger jump sundarban
व्हायरल व्हिडीओ (फोटो: @ParveenKaswan /Twitter)

वाघ शिकार करताना किंवा त्यांच्या अधिवासात आराम करताना दाखवणारे व्हिडीओ पाहण्यासाठी नेहमीच आकर्षक असतात. परंतु आणखी एक अविश्वसनीय व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे जो बघून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. IFS अधिकारी परवीन कासवान यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पश्चिम बंगालमधील सुंदरबनमध्ये शूट करण्यात आला आहे. जुना असला तरी, व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे आणि लोकांना पुन्हा आश्चर्यचकित केले आहे.

व्हिडीओमध्ये एक वाघ जंगलात सोडल्यानंतर बोटीतून उडी मारताना दिसत आहे. ही आश्चर्यकारक उडी अशी होती की जी आपण शब्दात वर्णन करू शकत नाही.

(हे ही वाचा: Optical Illusion: धबधबा आहे की पांढरे कपडे घालून उभे असलेले लोक? उत्तरात दडले आहे रहस्य)

(हे ही वाचा: Viral: आपल्या अंड्यासाठी थेट जेसीबीशी भिडला छोटा पक्षी, Video पाहून व्हाल भावूक)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

वाघाच्या बचावाचा आणि सुटकेचा व्हिडीओ ९३ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि त्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. व्हिडीओ पाहून लोक थक्क झाले. नेटिझन्सनी असेही निदर्शनास आणून दिले की क्लिपने त्यांना लाइफ ऑफ पायमधील सुंदर दृश्याची आठवण करून दिली जेव्हा रिचर्ड पार्कर नावाच्या वाघाने मागे न वळता बोटीतून उडी मारली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tiger dramatic jump from boat during release in sundarbans goes viral ttg

ताज्या बातम्या