Tiger Hunting Virall Video : आयु्ष्यात यशाचे उंच शिखर गाठण्यासाठी प्रचंड मेहनत आणि काबाडकष्ट कारवे लागतात. अगदी सहजरित्या कोणतंही यश तुमच्या पदरी पडत नाही. आयुष्याच्या प्रवासात आणि निसर्गाच्या सानिध्यात वावरताना हाती काही मिळवण्यासाठी जीवाचा आटापीटा करावा लागतो. एका वाघाच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं आहे. एका प्राण्याची शिकार करण्यासाठी वाघाने सुसाट धाव घेतली. तो प्राणी जीव वाचवण्यासाठी वाघाच्या पुढे सुसाट धावत होता अन् वाघ त्याच्यावर झेप घेण्याचा प्रयत्न करतो. पण पुढे असं काही घडलं, जे पाहून तुम्हाही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. वाघाची आणि त्या प्राण्याची लागलेली रेस कॅमेरात कैद झाली असून व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. आएफएस अधिकारी साकेत बदोला यांनी वाघाचा थरारक व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे. उत्तराखंडच्या कॉर्बेड नॅशनल पार्कमध्ये नेमकं काय घडलं? कॉर्बेटमधील एका जंगलात वाघ प्राण्याची शिकार करताना जीवाची बाजी लावत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. पण कोणतीही यशप्राप्ती मिळवण्यासाठी घाम गाळावा लागतो, असं वाघाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नक्की म्हणता येईल. वाघ प्राण्यावर पंजा मारण्यासाठी वाऱ्यासारखा धावला. पण तो प्राणीही चपळ होता. वाघ जितक्या वेगानं धावत होता त्याच्या दुप्पट वेगाने तो प्राणी धावत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. प्राणी आपल्यापासून खूप लांब गेल्या असल्याचे वाघाला जेव्हा समजतं, त्यावेळी वाघही त्याचा वेग कमी करतो. म्हणजेच शिकार करण्यात आपण अपयशी झालो असल्याचं वाघाला कळतं आणि तो शिकारीचा प्रयत्न सोडून देतो. नक्की वाचा - आईच्या पदरी गरीबीच्या झळा, बापाला रुग्णालयात नेण्यासाठी चिमुकल्यानं ३ किमीपर्यंत ढकलली हातगाडी, Video व्हायरल इथे पाहा व्हिडीओ https://twitter.com/Saket_Badola/status/1622452072661778433?s=20&t=3gGJUsSEqbMrZMvm7z8eEA ट्वीटरवर वाघाचा व्हिडीओ आएफएस अधिकारी साकेत बदोला यांनी शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलं," ज्यांना वाटतं आयुष्यात यशस्वी होणं खूप सोपं असतं, त्यांनी या शिकार करणाऱ्या वाघाला बघा. शिकारी करण्याआधी वाघालाही खूप वेळा अपयशाची पायरी चढावी लागते. पुन्हा विचार करा. आयुष्यात आणि निसर्गात कोणत्याही गोष्ट सोप्या मार्गाने मिळत नाही. जे यशाचा उंच शिखर गाठण्यासाठी प्रचंड मेहनत घेतात, त्यांनाच यशप्राप्ती मिळते." वाघाचा हा थरारक व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना आयुष्यात यशस्वी होणं किती अवघडं असतं? असा प्रश्न नक्कीच पडला असेल. वाघाने प्राण्यांची, माणसांची शिकार केल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. पण या व्हिडीओनं नेटकऱ्यांचा पार चक्रावून सोडलं आहे. या व्हिडीओ पाहिल्यानंतर एक चांगला बोध घेऊन आयुष्यात प्रवास करावा, असं नक्कीच म्हणता येईल.