Tiger Man Viral Video : सोशल मीडियावर जंगली प्राण्यांचे वेगवेगळे फोटो व्हिडीओ व्हायरल होत असतात. वाघाची डरकाळी ऐकून चांगल्या लोकांना घाम फुटतो. मात्र अशी कल्पना करा की तुम्ही कुठेतरी पायी जात आहात आणि अचानक तुम्हाला तुमच्या समोर वाघ दिसला, तुम्ही काय कराल? अशी परिस्थिती कोणावर ओढवली तर खेळ खल्लास हे नक्की. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर सगळ्यांचाच थरकाप उडालाय. मात्र या व्यक्तीनं वाघ दिसताच मृत्यूचं नाटक केलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल. ही व्यक्ती वाघासमोर मृत्यूचं नाटक करत झोपल्यानंतर या व्यक्तीचं काय झालं असेल, याचा विचार करून अंगावर काटा येतो. पण या व्यक्तीसोबत वाघाने शेवटी जे केलं ते आश्चर्यकारक आहे. काय घडलं? हे आता तुम्हीच पाहा. जंगालात भयानक शिकारी वाघ याचाही चांगलाच दरारा असतो. त्यामुळे वाघ आणि सिंह दोघेही खूप बलवान आणि हुशार प्राणी आहेत. त्यांच्या शिकारीचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. वाघ आणि सिंहाच्या हल्ल्यात वाचणं कठिण असतं त्यामुळे या प्राण्यांविषयी लोकांच्या मनात आणि प्राण्यांच्याही मनात भिती असते. वाघ दिसताच केलं मृत्यूचं नाटक या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती उभी आहे. तिच्या समोर पांढरा वाघ आहे. वाघाला पाहताच व्यक्ती आपल्या छातीवर हात ठेवते आणि खाली कोसळते. वाघ तिथंच समोर आहे.जशी ती व्यक्ती खाली पडते तसा वाघ धावत त्या व्यक्तीजवळ जातो. त्याच्या अंगावर चढतो. त्याचा वास घेतो, मग त्याला चाटतो त्याचा हात आपल्या जबड्यात धरतो. हे दृश्य पाहिल्यावर आपल्या अंगावर काटा येतो. मात्र काही वेळाने वाघ तिथून बाजूला होतो. पण शेवटपर्यंत वाघ या व्यक्तीला काहीच करत नाही. तो त्याचा पाळीव वाघ आहे असं व्हिडिओवरून दिसतं. जो मालकाला पडलेलं पाहताच त्याला वाचवायला धावतो. पाहा व्हिडीओ हेही वाचा >> पाकिस्तानात नाश्त्याला काय खातात? Video पाहूनच अनेकांना आल्या उलट्या; असं काय आहे तुम्हीच पाहा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. यावर काही युजर्सनी प्रतिक्रियाही दिल्या. एका युजरने म्हंटलंय की, “भीतीची भीती कशाला.” तर दुसऱ्या युजरने म्हंटलंय की, "प्राण्यांनाही दया असते."