Tiger vs Monkey video: सोशल मीडियावर जंगली प्राण्यांचे वेगवेगळे फोटो व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक वाघाचा आणि माकडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाघाच्या पट्ट्यात कोणी आले तर तो वाचणे तसे कठिणच. मात्र, एकाच झाडावर वाघ आणि माकड आल्यावर विचार करा काय होईल.पण एका माकडानं मात्र वाघाशी पंगा घेतला. अहो, एवढंच नव्हे तर त्यानं उलट वाघाला स्वत:हूनच डिवचलं. मग काय माकडाचा पाठलाग करत वाघ थेट झाडावरच चढला. माकड ज्या फांदीवर उडी मारेल वाघ तिथे पोहोचला. पुढे माकड आणि वाघाच्या लढाईत काय घडलं? हे आता तुम्हीच पाहा. ‘शिकार करो या शिकार बनो’ ‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी.अन्यथा तुमची काही खैर नाही हेच या माकडाने ओळखलं आणि वाघाशी दोन हात केले. माकडाच्या सापळ्यात अडकला वाघ व्हिडिओमध्ये दिसतं की झाडाच्या अगदी टोकावर बसलेल्या माकडाला पाहून वाघाचं मन बदलतं. वाघ कोणत्याही परिस्थितीत माकडाची शिकार करण्याचा निर्णय घेतो. याच नादात तो या झाडावरही चढतो, जिथे माकड फांदीवर बसून आराम करत असतं. आपला मृत्यू एक-एक पाऊल पुढे येत असल्याचं माकड पाहात राहातं. मात्र, इच्छा असूनही त्याला आपला जीव वाचवण्यासाठी काहीच करता येत नाही. तर वाघ फांद्याचा अंदाज घेत हळूहळू पुढे सरकत राहातो. पाहता पाहता वाघ माकडाच्या अगदी जवळ पोहोचतो. आता केवळ वाघाच्या एकाच उडीत माकडाची शिकार होणार असं दिसतं. मात्र म्हणतात ना की काही रस्ता दिसत नसला तरी शेवटपर्यंत प्रयत्न करायला हवा. माकडानेही हार मानली नाही आणि वाघाला आपल्याकडे आकर्षित करून जोरात उडी मारत मागे पळून गेलं. माकडावर हल्ला करण्याच्या नादात वाघही धाडकन खाली कोसळला. माकडाने साधली संधी मग काय संधी मिळताच माकडानं तिथून पळ काढला अन् स्वत:चा जीव वाचवला. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असून जंगलातील ही अनोखी फायटिंग पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. पाहा व्हिडीओ हेही वाचा >> भाईंदरमधला ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल; मुसळधार पावसात हरवलेल्या लेकाची अवस्था पाहून आईनं टाहो फोडला, नेमकं काय घडलं वाचा हा व्हिडीओ aprajeet_motivation नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर "अस्तित्वाच्या लढाईत संयम ठेवला की विजय नक्कीच होतो" असं कॅप्शन लिहलं आहे. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या कमेंट करत आहेत, एका युजरने कमेंट केली आहे की, "संयम महत्वाचा आहे आयुष्यात "